शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य आजाराने दहा बालकांचा मृत्यू

By admin | Updated: July 28, 2014 23:20 IST

लोकांना सुदृढ आरोग्य मिळावे, यासाठी शासनातर्फे दरवर्षी कोट्यावधीच्या योजना राबविण्यात येतात. मात्र योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी मागील तीन वर्षात किटकजन्य आजाराने साकोली

आरोग्य धोक्यात : साकोली रुग्णालयात तीनच वैद्यकीय अधिकारीसंजय साठवणे - साकोलीलोकांना सुदृढ आरोग्य मिळावे, यासाठी शासनातर्फे दरवर्षी कोट्यावधीच्या योजना राबविण्यात येतात. मात्र योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी मागील तीन वर्षात किटकजन्य आजाराने साकोली तालुक्यातील दहा बालकांना जीव गमवावा लागला आहे. साकोली उपजिल्हा रुग्णालयात केवळ तीनच डॉक्टर असल्यामुळे येथे रुग्णांची हेळसांड होत आहे.दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने तालुक्यातील जनता त्रस्त होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे लोकांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करावा लागतो. त्यामुळे रुग्णांची लुट सुरू आहे. परिणामी पैशाअभावी काही रुग्णांना उपचारही करता येत नाही. साकोली तालुक्यात एकोडी, विर्शी, गोंडउमरी, सानगडी, खांबा याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र यातील बहुतेक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसून बाहेरगावहून ये-जा करीत असतात. यावर्षी जून महिन्यात साकोली तालुक्यात डेंग्युची साथ होती. रुग्णांना रक्त नमुन्याची तपासणी व औषधोपचार खाजगी रुग्णालयात करावा लागत आहे. साकोली उपजिल्हा रुग्णालयात या आजाराची तपासणी झाली नाही. किटकजन्य आजाराने साकोली तालुक्यात तीन वर्षात दहा बालकांचा मृत्यु झाल्याची नोंद तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.सन २०११ मध्ये जयेश गजानन मेश्राम (२) रा.उमरी याचा चंडीपुरा या आजाराने, सन २०१२ मध्ये साहिल रामटेके (११) रा.विर्शी याचा जापानी मेंदूज्वर आजाराने, साहिल मारोती गोंधळे (२) रा.पळसपाणी याचा मेंदूज्वराने, ईसरत ईसराईल शेख (१३) रा.साकोली याचा डेंग्युने, चंद्रकांत गोविंदा गायधने (१८) रा.गडकुंभली, विशाखा अरविंद येवले (८) सानगडी याचा डेंग्युने मृत्यू झाला. सन २०१३ मध्ये माधुरी सोमनाथ लंजे (११) रा.साकोली, यश गिरीधारी मानकर (२) रा.साकोली, डुडेश्वर लक्ष्मण गांढरे (३०) रा.विर्शी याचा डेंग्यु आजाराने मृत्यु झाल्याची नोंद आहे.