शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्याबाबत वेतन पथक अधीक्षकांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:01 IST

मात्र वेतनाशी संबंधी मुख्य लिपिकाने ऐनवेळी सभेला दांडी मारल्यामुळे अद्ययावत माहिती न मिळाल्याने संघटनेनी नाराजी व्यक्त करुन मुख्य लिपिकाचा निषेध ठराव पारित करण्यात आला. यापुढे वेतनसंबंधी अद्यावत माहिती व सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन माध्यमिक वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी संघटनेला दिले.

ठळक मुद्देबैठकीला मुख्य लिपिकाची दांडी : भ्रष्टाचाराचे प्रकरण भंडारा जिल्हा समन्वय समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खाजगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतना संबंधित विविध प्रलबिंत समस्याचे निरसन करण्याकरिता अधीक्षक वेतनपथक माध्यमिक यांचे दालनात भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.मात्र वेतनाशी संबंधी मुख्य लिपिकाने ऐनवेळी सभेला दांडी मारल्यामुळे अद्ययावत माहिती न मिळाल्याने संघटनेनी नाराजी व्यक्त करुन मुख्य लिपिकाचा निषेध ठराव पारित करण्यात आला.यापुढे वेतनसंबंधी अद्यावत माहिती व सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन माध्यमिक वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी संघटनेला दिले.खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळेतील शिक्षकांच्या वेतनसंबंधित अनेक प्रलंबित समस्या निकाली काढणे व वेतन पथक कार्यालयातील वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालून लोकशाही मागार्ने पारदर्शक कामाचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.माध्यमिकचे वेतन पथक कार्यालय सध्या भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनले असून शिक्षकांचे नियमित वेतन, शालार्थ आयडी प्रस्ताव प्रकरणे, जिपीएफ पावती वितरित करणे, थकीत वेतन, अर्जित रजा रोखीकारण, वैधकीय देयके, जीपीएफ परतावा, आदी अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. यावेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.उल्हास फडके, जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, अंगेश बेहेलपांडे, सुधाकर देशमुख, सैंनपाल वासनिक, विलास खोब्रागडे तसेच वेतन पथकचे लेखासहाय्यक ए.एम.पालकर, कनिष्ठ लिपिक प्रितम पिसे उपस्थित होते.सध्यास्थितीत कार्यालयीन कामाचा व्याप व शिक्षकांचे वेतनसंबंधी संघटनेची सभा असल्याने आपण अद्यावत माहितीसह उपस्थित राहण्याबाबत सूचना केली होती. मात्र रजा मंजूर करायची असेल तर करा अथवा नका करू, असे उलट उत्तर देत रजेचा अर्ज ठेवून गेले. त्याच वेळी अर्ज नामंजूर करण्यात आले.-प्रतिभा मेश्राम, अधीक्षक, वेतन निधी पथक माध्यमिक, भंडारा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र