प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:41+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प्याने पाठविण्याचे ठरले, उच्च परिक्षेला बसण्याच्या मंजुरीचे प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे ठरले.

Discussion with elementary teachers on issues of group education | प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दहिवले यांच्याशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या भंडारा तालुका शिष्टमंडळाने चर्चा केली. शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केले. यात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी एच. के. दहिवले यांनी दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांमध्ये निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांची माहितीकेंद्र प्रमुखांमार्फत ५ नोव्हेंबरपर्यंत मागवून त्वरीत जि.प.ला प्रस्ताव सादर करण्याचे ठरले, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवा पुस्तिका केंद्रानुसार टप्प्याटप्प्याने पाठविण्याचे ठरले, उच्च परिक्षेला बसण्याच्या मंजुरीचे प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे ठरले. मुळ व दुय्यम सेवापुस्तिका अद्यावत करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर शिबिर घेण्याचे मान्य करण्यात आले.
याशिवाय सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जमा न झालेल्या शिक्षकांची यादी पाठवून लाभ द्यावा, सेवानिवृत्तांचे जीपीएफ प्रस्ताव, गटविमा प्रस्ताव व सातव्या वेतन आयोगाची निश्चिती करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी.राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम. पडोळे, शेंडे, लिपीक ढबाले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, राज्य चिटणीस नरेश कोल्हे, राज्य पदाधिकारी झाशीराम पटोले, संजय आजबले, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, भगवान गायधने, दिलीप बाभरे, गौतम मेश्राम, विनायक कोसरे, राजेश गजभिये, उत्तम राठोड, बी.डी. सेलोकर, संतोष चव्हाण, अनिल शहारे, आशा गिºहेपुंजे, धरती बोरवार, मीना बोरकर, नेपाल तुरकर ,धनराज भोयर, भोजराज भोयर, मनोहर पारधी, अंकुश हलमारे, सत्यवान उरकुडे, वामन गुर्वे, अचल दामले, नागसेन गजभिये आदीे शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Discussion with elementary teachers on issues of group education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक