शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत

By admin | Updated: November 26, 2015 00:33 IST

महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

पाण्याचा उपसा बंद : उन्हाळी धानाचे पीक वांद्यात, लोकप्रतिनिधींवर रोषचुल्हाड : महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या दीड महिनाभरापासून वीज पुरवठा खंडीत आहे. या प्रकल्पस्थळात सुरक्षा गार्ड अंधारात निगराणी ठेवत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.वीज वितरण कंपनीचे खरीप हंगामातील ३४ लाखांचे विजेचे देयके थकल्याने प्रकल्प स्थळात गेल्या महिन्यात सात तारखेला वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रकल्पस्थळात या कालावधीत पाण्याचा उपसा थांबल्याने पुढील वर्षात घेण्यात येणारे उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे. लोकप्रतिनिधी तथा सरकारच्या निष्क्रिय धोरणाचा फटका सिहोरा परिसरातील शेतीला बसणार आहे. ऐन खरीप हंगामात बावनथडी नदी पात्रात पाणी दुथडी भरून वाहत असताना पंपगृह विलंबाने सुरु करण्यात आला होता. यामुळे चांदपूर जलाशयाला ओव्हरफ्लो करता आले नाही. यामुळे जलाशयात अंतीम क्षणापर्यंत २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली होती. या पाण्यामुळे सिहोरा परिसरात १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यात यश आले. प्रकल्पस्थळात ९ पंपगृह असताना अखेरपर्यंत २ पंपगृह नादुरुस्त ठेवण्यात आले आहे. यामुळे अतिरिक्त पाण्याचा उपसा करण्यात आलेला नाही. प्रकल्पस्थळात सुरुवातीपासून ठिकठाक नसल्याची माहिती अस्थायी कामगारांनी दिली होती. परंतु लोकप्रतिनिधी तथा यंत्रणेमार्फत गांभीर्याने घेण्यात आले नाही. नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निधी नसल्याची बोंबाबोंब करीत होती. पंपगृह पाण्याचा उपसा करीत असताना शासन स्तरावर निधीची जुळवाजुळव करण्यात आली नाही. महिनाभर पंपगृहाने पाण्याचा उपसा केल्यानंतर विजेचे देयक थकविल्याचे कारणावरून वीज पुरवठा खंडीत करण्यात कारवाई करण्यात आली आहे. यामुळे १५ दिवस निरंतर उपसा करण्यात येणारा इतका पाणी नदीपात्रात वाहून गेला आहे. यामुळे या संकटात पाण्याची साठवणूक करता आली नाही. वीज पुरवठा सुरु करण्यासाठी उपविभागीय अभियंता पी.एन. लांजेवार यांनी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत तडजोडीतून मार्ग काढण्याचा मध्यंतरी प्रयत्न केला आहे. पाच टप्प्यात विजेचे देयके जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु हे प्रयत्न फिस्कटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २० दिवस आधी करण्यात आलेले या चर्चेचे फलीत प्रकल्प स्थळात दिसून आले नाही. (वार्ताहर)