जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नगर पालिका प्रशासनाविरूद्ध नागरिकांमध्ये असंतोषभंडारा : नगरपरिषदेच्या हलगर्जी व अनागोंदी कारभारामुळे भंडारा गांधी चौक, छोटा बाजारातील नगर परिषदेतील गेट ते क्रांती वॉर्ड, गांधी वॉर्ड, शहीद वॉर्ड या वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य व जनजीवन धोक्यात आले आहे. या लोकवस्तीतून मच्छी, मटन, भाजीपाला दुकाने व अतिक्रमण हटवून बाजार नेहरू बालोद्यान किंवा जिल्हा रूग्णालयाकडील मोकळ्या जागेत हलविण्यात यावे, अशी मागणी गांधी वॉर्ड, शहीद वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, छोटा बाजार परिसरातील नागरिकांनी केली आहे.गांधी वॉर्ड, शहीद वॉर्ड, क्रांती वॉर्ड या तिन्ही वॉर्डात राहणाऱ्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने, रहदारी व मुलामुलीचे शिक्षणाचे दृष्टीने या बाबीचा त्रास होत आहे. करीता सदर बाबीचा मोक्यावर तपासणी करूनच आपण स्वत: या अडचणीचा विचार करून सदर बाजार नेहरु बालोद्यान किंवा जनरल हॉस्पीटल कडील मोकळ्या जागेत हलविण्यात यावे.सदर वॉर्डात लोकवस्तीने राहणाऱ्या लोकांचे घरासमोर मच्छी, मटन, धान्य, भाजीपाला यांची दुकाने लावण्याकरिता रहदारीचे रस्त्यावर व मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून मोठमोठ्या झोपड्या तयार करून दुकाने लावली आहेत व रहदारी रोडवर मोठमोठे टिनाचे शेट व ओटे तयार केले आहेत. त्यामुळे सदर भागात राहणाऱ्या लोकांचे स्वत:चे घरी जाणे - येणे व वाहने नेण्याचे रस्ते बंद झाले आहेत. स्थानिक राहणाऱ्या लोकांचे घरासमोर लोकांचे अंगणात, दारात, मच्छी मटनाचे व भाजीपाल्याचे दुकान लावत असतात. त्यामुळे लोकांचे स्वत:चे घरात राहणे अवघड झाले आहे. कारण सगळी दूषित हवा (गंधगी) व प्रदूषण, घाण होत असून त्यात भाजीपाला, कचरा, मटन, मच्छी, पाणी जमा होवून कुजतो व त्यामुळे एक नवीन व्यक्ती या घाणेरड्या वासामुळे लोकांचे घरी एक मिनिट सुद्धा थांबी शकत नाही. पावसाळ्यात तर सगळीकडे घाण व घाणेरड्या वासामुळे लोकांचे राहणे कठीण होवून जाते. सात दिवसांच्या आत बाजार अन्यत्र हटविण्याबाबद व तसा अहवाल कळविण्याबाबद सांगितले होते. पण त्याबाबद अजूनही कार्यवाही झालेली नाही. पण दरवर्षी याबाबत पत्रव्यवहार, तक्रार देणे चालू असून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. तरी वरीलप्रमाणे समस्याची, अडचणीची मोक्यावर प्रत्यक्ष पाहणी करूनच योग्य ती कारवाई त्वरीत करावी अन्यथा आम्हाला मोर्चाचे व आमरण उपोषणाचे मार्ग स्वीकारावे लागतील व त्यात शासन व शासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व नगरपरिषद अधिकारी व पदाधिकारी जबाबदार राहतील. तरी विनंती आहे की, सदर छोटा बाजार, मच्छी, मटन लहान मोठे भाजी विक्रेता व टपरीवाले यांना नेहरु बालोद्यान किंवा जनरल दवाखान्याकडील मोकळ्या जागेत नेण्यात यावा अशी मागणी आहे. निवेदनावर कैलाश तांडेकर, रमेश गायकवाड, चुडामन हेडावू, महेश बारमाटे, अनुराग बसवारे, प्रमोद रायपुरकर, गौरीशंकर राऊत, कैलाश चव्हाण, वसंतराव गायधने, प्रभाकर गायधने, वृंदा गायधने, मुनेश्वर चकोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
दुर्गंधीमुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: September 20, 2016 00:32 IST
नगरपरिषदेच्या हलगर्जी व अनागोंदी कारभारामुळे भंडारा गांधी चौक, छोटा बाजारातील नगर परिषदेतील गेट...
दुर्गंधीमुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}