शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

By admin | Updated: April 25, 2017 00:16 IST

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांनी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कामात अनियमितता केली.

प्रकरण लघु पाटबंधारे विभागातील : आयुक्तांनी मागितले लोकमतचे कात्रण प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांनी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कामात अनियमितता केली. त्यांचे मनसुबे ‘लोकमत’ने उधळून लावीत वृत्तांची मालीका लावली. यामुळे पराते यांचे पितळ उघडे पडले. त्यांनी केलेल्या अनेक कामांची मंत्रालयातून विभागीय चौकशी करण्याचे आदेश धडकले आहेत. याबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तांचे कात्रण मागितले आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांनी मागील वर्षी कामांच्या ई-निविदेबाबत मोठा घोळ केला होता. या प्रकारातून पराते यांनी लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित करून त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. लोकमतमध्ये वृत्तपालिका सुरु होताच कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांनी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याकरिता अनेक चुका केल्याचे प्रकरण समोर आले. पाऊस पडल्यानंतर तलावांचे कामे करण्यास अडचणी निर्माण होतील अशा कामांना मुद्दामच त्यांचे वर्क आॅर्डर थांबवून हे सर्व पावसाळ्याच्या तोंडावर पी.एस. पराते यांनी अनेक कामांचे वर्क आॅर्डर दिले होते.यातून सदर कंत्राटदारासोबत हातमिळवणी करून लाखोंच्या देयकांची उचल करून कामे झाल्याचे दाखविल्याचा प्रयत्न या माध्यमातून पराते यांनी केला होता. सोबत तलावांच्या दुरुस्तीचे व मोजणीचे तांत्रिक काम मजूर संस्थेला दिले होते. वास्तविकतेत हे तांत्रिक काम मजूर सहकारी संस्थेऐवजी सुशिक्षित बेरोजगार संस्थेकडून करणे गरजेचे होते. मात्र आर्थिक तरतुदीपोटी हे काम मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. सोबतच कामांची करण्यात आलेली ई-टेंडरिंग यातही मोठा घोळ करण्यात आला होता. या सर्व बाबतीत ‘लोकमत’ने प्रकरण लावून धरल्याने पराते यांनी प्रकरणावर पांघरूण घालून ई-निविदा रद्द केली व मजूर सहकारी संस्थेला दिलेले काम थांबवून नव्याने निविदा काढून बेरोजगारांना देण्यात आले. असे एक ना अनेक प्रकार लघु पाटबंधारे विभागात लोकमतने उघड केल्याने याची मंत्रालयातून चौकशीचे आदेश धडकले आहेत. ‘लोकमत’चे मागितले कात्रणकार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांच्या प्रकरणांची मालिका ‘लोकमत’ने लावून धरली. यामुळे या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश बजावले आहे. या प्रकरणाची माहिती आयुक्तांनी मागितली आहे. या संबंधात ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांची कात्रणे मागितले आहे. कार्यकारी अभियंता पी.एस. पराते यांनी ई-निविदा, मजूर सहकारी संस्थांना दिलेल्या कामाची निविदा व त्यानंतर बदलवून नव्याने प्रकाशित केलेली निविदा सोबतच लाखो रुपयांच्या निधी परत पाठविणे यासह पाच प्रकरणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांनी बजावले आहे. यादृष्टीने ‘लोकमत’च्या कात्रणांची गरज पडली.- जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा.