शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या श्रावण मासाचे उपवास सुरू असून, सोबतच सणासुदीलाही प्रारंभ झाल्यामुळे फळांना मागणी वाढली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : सध्या श्रावण मासाचे उपवास सुरू असून, सोबतच सणासुदीलाही प्रारंभ झाल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. परिणामी, फळांचे दर चढले असतानाच, डेंग्यूमुळे मात्र ड्रॅगन फ्रुट भाव खात आहे. डेंग्यूवर ड्रॅगन फ्रुट उतारा असल्याचे बोलले जात असल्याने, ड्रॅगन फ्रुटला मागणी वाढल्याचे त्याचे दरही वाढले असतानाच, सध्या शहरातील बाजारात ड्रॅगन फ्रुटचे शॉर्टेज असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

बॉक्स

आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त

सध्या ड्रॅगन फ्रुट भाव खात असतानाच पुरवठा नसल्याने त्याचे शॉर्टेज झाले आहे, तर दुसरीकडे २०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकले सफरचंद सध्या घसरले असून, आवक वाढल्यामुळे ते सध्या १०० रुपये किलो दराने विकले जात आहे. येथे सफरचंद नागपूर येथून आणले जातात.

सध्या आवक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे दर घसरल्याचे व्यापारी सांगतात.

बॉक्स

डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा

ड्रॅगन फ्रुटमध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम, झिंक, व्हिटॅमिन-सी सारखे मायक्रो न्युट्रिएंट व अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते व मोसमी, तसेच व्हायरल फिव्हरशी लढायला आपल्या शरीराला ताकत मिळते. यामुळे ड्रॅगन फ्रुटचे सेवन शरीरासाठी खूपच फायदेशीर असल्याचे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे यांनी सांगितले.

कोट

ड्रॅगन फ्रुटचे शॉर्टेज

मध्यंतरी ड्रॅगन फ्रुट १२०-१३० रुपये किलो दराने विकले जात होते व त्यांची आवकही होती. मात्र, सध्या ड्रॅगनची फ्रुटची मागणी वाढली असतानाच त्यांचा पुरवठा होत नसल्याने शॉर्टेज आहे. यामुळे ड्रॅगन फ्रुट महागले असून, सध्या १६० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे.

- आशिष पालटकर, फळ विक्रेता