शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनापूर्वीच मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भारनियमनाने वैतागलेल्या करडी परिसरातील शेतकऱ्यांनी १८ एप्रिल रोजी तुमसर -साकोली राज्यमार्गावरील वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या संतापाचा अंदाज येताच महावितरण कंपनीने चांगलाच धसका घेतला. आंदोलनाच्या २४ तासापूर्वीच करडी ठाण्यात आंदोलकांना बोलावून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.करडी व मुंढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी पंपांना १० ते १२ तासाचा वीज पुरवठा करण्यात यावा, रात्रीऐवजी दिवसा पुरवठा करण्यात यावा, बंद मीटर काढून नवीन मीटर बसविण्यात यावे, या तीन मागण्यांसाठी करडी वीज वितरण कार्यालयासमोर रास्ता रोको व मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे पदाधिकारी तथा मुंढरी खुर्दचे सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे व मोहाडी तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अनिल सार्वे करणार होते. तसे निवेदनही नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालकांना देण्यात आले होते. आंदोलनाची जय्यत तयारी परिसरातील २५ गावात सुरू होती. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण होण्याचा अंदाज येताच प्रशासन पुरते हादरले.अखेर १७ एप्रिल रोजी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना करडी ठाण्यात चर्चेसाठी बोलविण्यात आले. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संजय भुते व शेतकऱ्यांत सविस्तर चर्चा झाली. आठ तास नियमित वीज व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने अखेर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, सरपंच रामप्रसाद नेरकर, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल सार्वे व शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी