शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: July 17, 2014 23:54 IST

देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची त्वरीत स्थानांतरण करून आरोग्य केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी देव्हाडी तथा स्टेशनटोली येथील

तुमसर : देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याची त्वरीत स्थानांतरण करून आरोग्य केंद्रातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी देव्हाडी तथा स्टेशनटोली येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा आरोग्य केंद्रासमोरच आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.देव्हाडी येथे राज्य शासनाने सुमारे २२ वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले होते. १५ वर्षापूर्वी येथे एक कोटी रुपये खर्च करून प्रशस्त जागेत प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधकाम करण्यात आले. या केंद्रांतर्गत २४ गावे परिसरातील येतात. परंतु सातत्याने हे उपकेंद्र रुग्णांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी असमर्थ ठरले आहे. येथे डॉक्टर्स व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. दि. १२ जून रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक सभा घेण्यात आली. या सभेत ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी स्थानांतरणाची मागणी केली होती. त्यानंतर चार कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.कुरैशी सुमारे येथे ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे स्थानांतरण का करण्यात आले नाही? असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यंनी उपस्थित केला आहे. सध्या डॉ.कुरैशी यांचेकडे तालुका अधिकाऱ्याचा प्रभार आहे. यामुळे ते देव्हाडी येथे सेवा देण्यास असमर्थ ठरत आहेत. देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणे व डॉ.कुरैशी यांचे त्वरीत स्थानांतरण करण्याची मागणी येथे जोर धरत आहे. डॉ.कुरैशी मुख्यालयी राहत नाहीत. २४ गावाचे आरोग्य सध्या एका डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात येते. आरोग्याचा मूलभूत हक्कात समावेश होतो. सध्या येथील ग्रामपंचायत पदाधिकारी हक्काकरिताच उपोषणाचा मार्ग पत्करीत आहेत. देव्हाडीच्या सरपंचा सुनिता बिरणवारे, स्टेशनटोलीचे सरपंच आकाश उके, उपसरपंच शाम नागपुरे तथा सुकळी, तुडका, माजी पंचायत समिती सदस्यांनी याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)