भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या ‘स्वर्ग रथाचे’ लाेकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:29+5:302021-01-16T04:39:29+5:30

खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भाेंडेकर, जीवनचंद्र निर्वाण, भगवानदास रावलाणी आणि भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक मंगेश वंजारी यांच्याहस्ते लाेकार्पण ...

Dedication of 'Swarg Rathche' of Raja Pratishthan of Bhandara | भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या ‘स्वर्ग रथाचे’ लाेकार्पण

भंडाराचा राजा प्रतिष्ठानच्या ‘स्वर्ग रथाचे’ लाेकार्पण

खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भाेंडेकर, जीवनचंद्र निर्वाण, भगवानदास रावलाणी आणि भंडाराचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक मंगेश वंजारी यांच्याहस्ते लाेकार्पण पार पडले. अंत्यसंस्कारासाठी माेक्षधामापर्यंत जाताना मृतांच्या नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागत हाेता. शहरात माेजकेच स्वर्ग रथ असल्याने समस्या निर्माण हाेत हाेती. हीच समस्या लक्षात घेऊन भंडाराचा राजा प्रतिष्ठान, लाॅयन्स क्लब ग्रीन सिटी आणि सहयाेग ट्रस्टच्या माध्यमातून स्वर्ग रथ तयार करण्यात आला. यावेळी नीतेश श्रीसागर, जाकी रावलानी, मुनेश्वर चकाेले, संताेष घाेगरे, प्यारेलाल पशिने, भाष्कर तिघरे, शैलेश पशिने, याेगेश हेडाऊ, निखिलेश वंजारी, निमिश डाेकरीमारे, सुनील घोडमारे, भारत मल्हाेत्रा, मंगेश मुरकुटे, राेशन काटेखाये, सुरेश धुर्वे, बाळा थाेटे, अमित बिसने, राेशन येळणे, घनश्याम जांगळे, सागर रायपूरकर, प्रकाश वंजारी, पप्पू काेल्हटकर, भरत भलगट, कुणाल न्यायखाेर, साेनू कळंबे, सैफी खान, आाशिष खराबे, खुशाल निपाने, प्रवीण गभाणे, मनाेज साकाेरे, जयंत साकाेरे, जितू चांदेवार आदी उपस्थित हाेते.

Web Title: Dedication of 'Swarg Rathche' of Raja Pratishthan of Bhandara