शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या परतफेडीनंतरही भूखंडाचे कागदपत्र देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:42 IST

स्व:मालकीचा भूखंड 'मॉरगेज' करून स्थानिक स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथून चार लाख रूपयांचे कर्ज घेतले होते.

दडपशाही कारभार : कर्जदार त्रस्त, स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथील प्रकारुतुमसर : स्व:मालकीचा भूखंड 'मॉरगेज' करून स्थानिक स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर येथून चार लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान कर्जदाराने कर्जाची मुळ रक्कम संपूर्ण व्याजासह पतसंस्थेला परत केली. तसी पतसंस्थेने एनओसी दिली आहे. मात्र 'मॉरगेज प्लॉट'चे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करून कर्जदाराला प्रताडित करण्याचा प्रकार तुमरात उजेडात आला आहे.जितेंद्र किसन बोरकर (४०) रा. विनोबा भावेनगर, खापाटोली तुमसर असे त्रस्त झालेल्या कर्जदाराचे नाव आहे. गत दीड वर्षापुर्वी जितेंद्र बोरकर या इसमाने स्थानिय दुर्गानगर भंडारा रोड स्थित स्रेह नागरी सहकारी पतसंस्था तुमसर या पतसंस्थेतून चार लाख रूपयांचे कर्ज 'प्लॉट मॉरगेज' करून उचलले होते. दरम्यान ३१ मार्च रोजी १० हजार रूपये रोख व चार लक्ष ५० हजार रूपयाचे कोटक महिंद्रा बँकेचे धनादेश असे एकूण ४ लाख ६० हजार रूपये कर्जाच्या मुळ रक्कमेसह व्याजाचा एकमुस्त भरणा केला. २० मे रोजी स्रेह नागरी पतसंस्थेने जितेंद्र बोरकर याला चार लाख रूपये व त्यावरील व्याजाची पुर्णपणे परतफेड केली, तशी एनओसी तथा प्रमाणपत्र दिले. मात्र 'मॉरगेज प्लॉट'चे कागदपत्र देण्यास पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने असमर्थता दाखविली. त्यांनी अध्यक्षांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यावर पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल घनश्याम लांजेवार यांना भेटले असता त्यांनी तुम्ही दुसऱ्या कर्जदाराचे 'गॅरंटर' असल्यामुळे कागदपत्र देता येणार नाही. त्यावर कर्जदाराने प्लॉटच्या विरुध्द गॅरंटर ठेवले होते का, असा सवाल विचारताच त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. कोणत्याही परिस्थिती कागदपत्र मिळणार नाही, असे लांजेवार यांनी बजावले. जितेंद्र बोरकर याला त्याचेही कर्ज भर म्हणून धमकावले. त्यामुळे बोरकर शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी न्यायासाठी सहायक निबंधकाकडे तक्रार केली. पतसंस्था ही केवळ तुमसर पुरती मर्यादित असताना ग्रामीण भागातील नागरिकांना कर्ज वाटप केले कसे, असा आरोप दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यामुळे पतसंस्थेची योग्य चौकशी झाल्यास पितळ उघडे पडणार असल्याचे चिन्ह आहेत. (शहर प्रतिनिधी)तक्रार मिळाली आहे. चौकशी करून लवकरच न्याय निवाडा लावण्यात येईल.-पी. डब्ल्यु. भानारकर, सहायक निबंधक, तुमसर.