शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या धसक्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:25 IST

खापा येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे आंदोलन झाले. आंदोलकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू केले.

प्रकरण खापा येथील महिलेच्या मृत्युचे : पोलिस महानिरीक्षकांना निवेदन, डॉक्टरवर गुन्हा दाखलतुमसर : खापा येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर खापा येथे आंदोलन झाले. आंदोलकावर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकसत्र सुरू केले. ११ जणांनी न्यायालयातील कोठडीत रवानगी करण्यात आली. याचा तिघांनी धसका घेतला. त्यापैकी दोघे मृत्युमुखी पडले तर एका गणाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. खापा येथील युवक समुहाने राहत असल्याची माहिती आहे.यादरम्यान याप्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या मारहाण, लाठीमार व पोलिसांची दडपशाहीचा धसका रूखमा काशीराम गभने तथा नत्थू भोयर यांनी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला तर रघुनाथ राखडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कुणाचा नातू मुलगा तुरूंगात बंद आहे. काही युवकांनी गावातून पलायन केले आहे. त्यांच्या आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खापा येथील नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून नमूद केले आहे की, जयश्री राजेश बनकर या गर्भवती महिलेचा २९ आॅगस्ट रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी याकरिता मागण्याकरिता खापा चौकात शेकडो ग्रामस्थ शांततेने बसलेले होते. ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला व अश्रुधूराचा वापर केला. त्यानंतर प्रकरण शांत झाले. ३० आॅगस्टच्या रात्रीपासून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. आंदोलक ३० ते ३५ महिला व पुरूषांना पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांच्या दहशतीपोटी कुणीही दवाखान्यात गेले नाही. गावातील युवक बाहेरगावी गेले. निरपराध महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. शांततामय मार्गाने निषेध नोंदविणाऱ्यावर लाठीमार प्रकरणाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी आहे.(तालुका/शहर प्रतिनिधी)