शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुलावरुन जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

दाेन ते तीन दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी रॅली नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे. अगदी दाेन फुट अंतरावर रॅलींगच्या बाजूला कच्चा रस्ता आहे. याच रस्त्यावरुन कठडा ओलांडत जुनापुलावरुन वाहतूक सुरु आहे.  कठडा नसल्याने केव्हा माेठी अनुचीत घटना घडेल याचा नेम नाही. मात्र नागरिकही जीव मुठीत घेवून जमीनीवरील लाेखंडी रॅलींग पार करीत वाहतूक करीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा प्रशासनाने १८ दिवसांपूर्वी वैनगंगा नदीवरील जुना कारधा पूलावरील रहदारी कायमस्वरुपी बंद केली. मात्र पुलावरील लाेखंडी कठडे नसल्याने नागरिकांची येथून जीवघेणी वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दाेन्ही बाजूने अशी व्यवस्था झाली आहे. गाेसेखुर्द प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ करण्यात आली आहे. २४५.५० मीटर जलसाठा वाढविण्यापर्यंत निर्णय झाला आहे. त्या दिशेने कार्यही सुरु आहे. जलपातळीत वाढ हाेत असतानाच २४ नाेव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने कारधा जुना पुलावरील वाहतूक कायम स्वरुपी बंद केली. त्या दिवशापासून येथून रहदारी बंद हाेती. मात्र दाेन ते तीन दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी रॅली नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे. अगदी दाेन फुट अंतरावर रॅलींगच्या बाजूला कच्चा रस्ता आहे. याच रस्त्यावरुन कठडा ओलांडत जुनापुलावरुन वाहतूक सुरु आहे. कठडा नसल्याने केव्हा माेठी अनुचीत घटना घडेल याचा नेम नाही. मात्र नागरिकही जीव मुठीत घेवून जमीनीवरील लाेखंडी रॅलींग पार करीत वाहतूक करीत आहेत.इंग्रजकालीन या पुलाने शंभरी गाठली आहे. परिणामी हा पुल २०१६ मध्येच जिल्हा प्रशासनाने जड वाहतूकीसाठी बंद केला हाेता. तेथून ग्रामवासीयांच्या आग्रहास्तव फक्त दुचाकी वाहतूक सुरु हाेती. या पुलावरुन ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणात मजूर वर्ग भंडारा शहरात येत असे. आजही वाहतूक बंद असली तरी सायकलने येणारे काही मजूर या पुलावरुन येत आहेत. आतातर लाेखंडाची रॅलींग नसल्याने दुचाकीस्वारांचे चांगलेच फावले आहे. जीवावर बेतून हा सर्व प्रकार सुरु आहे. याकडे जिल्हा प्रशासन काेणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जबाबदारी कुणाची?- वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाल्याने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा भार नवीन पुलावर आला आहे. मजूरवर्ग व दुचाकीधारक जीव मुठीत घेवून माेठ्या पुलावरुनही रहदारी करीत आहे. जुना पुलावरुन वाहतूक बंद झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येत असताना जुना पुलावरील धाेक्याची वाहतूक हाेत आहे. यात अनुचीत घटना घडल्यास जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित हाेताे.

 

टॅग्स :riverनदीTrafficवाहतूक कोंडी