निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:39+5:30

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Deadline to spend funds March 31 | निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च

निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सन २०१९-२० मध्ये देण्यात आलेला निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च आहे. परिणामी यंत्रणांना प्राप्त झालेला निधी सदर तारखेपर्यंत खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. प्रशासकीय मान्यता घेणे बाकी असल्यास तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निधीची बचत असल्यास यंत्रणांनी लेखी प्रस्ताव नियोजन अधिकारी यांना सादर करावा. यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे. नाविन्यपूर्ण व पूर्वविनियोजनासाठी निधी मागणी असल्यास तात्काळ सादर करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

या विभागांचा आढावा
सभेत कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, कौशल्य विकास, रेशिम, नगरविकास, जलसंधारण, लघुपाटबंधारे, पानलोट, जिल्हा उद्योग केंद्र, पर्यटन, नाविन्यपूर्ण योजना यासह विविध योजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.

Web Title: Deadline to spend funds March 31