शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पांजऱ्याच्या खेळाडूची भारतीय संघात निवड

By admin | Updated: April 15, 2016 00:49 IST

भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पांजरा येथील एका मजुराच्या मुलाची निवड झाली आहे.

हंगेरीत स्पर्धा : छोट्याशा गावातून घडलामोहन भोयर  तुमसर भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पांजरा येथील एका मजुराच्या मुलाची निवड झाली आहे. अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील दौड स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आकाश देवाजी शेंडे (१६) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर आकाशने हे सिद्ध करून दाखवून दिले. तुमसरहून आठ कि.मी. अंतरावर पांजरा हे ४०० लोकवस्तीचे गाव आहे. वडील लाकडे फोडण्याचे कामे करून कुटूंब चालवितात. बालपणापासून आकाशला खेळण्याची आवड होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला साहित्य उपलब्ध झाले नाही. परंतु त्याचातला खेळण्याचा गुण मात्र कमी झाला नाही. सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अ.वा. बुद्धे यांनी स्व.फत्तुजी बावनकर क्रीडा मार्गदर्शक केंद्र सुरू केले. याची माहिती आकाशला झाली. आकाश पांजरा ते बड्डा क्रीडांगणावर सकाळी ६ व सायंकाळी ५ वाजता सरावाकरिता येत होता. धावण्याचे उपजत कौशल्य त्याच्यात असल्याचे अ.वा. बुद्धे यांनी हेरले. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला. सन २०१२ मध्ये पहिल्याच वर्षी त्याची निवड गडचिरोली येथील क्रीडा प्रबोधिनीत झाली. केरळमध्ये राष्ट्रीय शालेय स्पर्धे त्याने नेत्रदीपक कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. सध्या आकाश दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे प्रशिक्षण घेत आहे. १०० मीटर व ४०० मीटरमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.