शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊ नमध्ये पेट्रोल टॅँकरवर बसून मजुरांचा धोकादायक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे लोंढे जात आहेत. मालवाहतूक वाहनाच्या छतावर गर्दीने मजूर जात आहेत.

ठळक मुद्देजिल्हाबंदीवर प्रश्नचिन्ह। मालवाहू वाहनानेही सुरु आहे प्रवास

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉकडाऊनचे कडक नियम असतांना व जिल्हाबंदीतही अत्यंत ज्वलनशील पेट्रोल टँकरवर बसून मजूरांनी नागपूर-गोंदिया दरम्यान प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीसांची नाकाबंदीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुरुवारी सकाळी भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने टॅँकरवर बसून मजूरांनी प्रवास केला. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांनी अनेकांनी बघितले. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु नागपूर येथून दररोज मालवाहतूक वाहनातून मोठ्या प्रमाणात मजूरांचे गावाकडे लोंढे जात आहेत. मालवाहतूक वाहनाच्या छतावर गर्दीने मजूर जात आहेत. गुरुवारी पेट्रोल भरलेल्या टॅँकरवर सुमारे १२ ते १५ मजूर बसून गोंदियाकडे गेले. पेट्रोल हा अतिशय ज्वलनशिल द्रव पदार्थ आहे. तशा सूचना त्या टँकरवर लिहिलेल्या असतात. जीव धोक्यात घालून या मजूरांनी प्रवास केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय व राज्यमार्गाने जातांना या मजूरांना कुणी बघितले नाही काय? जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. टॅँकरवर ते मजूर कसे बसले. सदर टॅँकर कोणत्या मार्गाने आला असे अनेक प्रश्न येथे अनुत्तरीत आहेत. खापा चौफुलीवरुन सदर टॅँकर जातांना अनेकांनी बघितले. संचारबंदीचे सर्रास उल्लंघन येथे झाले. मोठ्या वेगाने हा टँकर येथून निघून गेला.

तुमसर येथे संचारबंदीचे उल्लंघन
खापा चौफुलीवरुन दररोज मालवाहतूक पीकअप वाहनात दाटीवाटीने व त्यावर बसून दररोज मजूरांची वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. नागपूरवरुन वाहनात कोंबून ते भंडारा येथे येतात व भंडारा येथून नंतर तुमसर मार्गे त्यांची वाहतूक सुरु आहे. पोलीस प्रशासनाने येथे कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिक