मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी धानपिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:25+5:30

परिसरात दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी होत आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात उन्हाळी धानाच्या कडपा पाण्याखाली सापडल्या. दररोज ढगाळ वातावरण दिसते आहे. कोंढा येथे सोमवारी दुपारी जोरदार पाऊस आला. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले. कापलेले धान पाण्यात ओले झाले. कडपा ओल्या झाल्या आहेत.

Damage to summer crops due to pre-monsoon rains | मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी धानपिकाचे नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी धानपिकाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : कोंढा परिसरात मान्सून पूर्व आलेल्या पावसाने उन्हाळी धान पीक कापणी केलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
परिसरात दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाच्या सरी होत आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात उन्हाळी धानाच्या कडपा पाण्याखाली सापडल्या. दररोज ढगाळ वातावरण दिसते आहे. कोंढा येथे सोमवारी दुपारी जोरदार पाऊस आला. त्यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले. कापलेले धान पाण्यात ओले झाले. कडपा ओल्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दररोज आकाशात ढग जमत आहेत.
यापुर्वी गारपीट, अतीवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी धानपिकाचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
 

Web Title: Damage to summer crops due to pre-monsoon rains

टॅग्स :agricultureशेती