कोरोना योद्धाचा राज्यपालांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:32+5:30

एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएसची पदवी घेऊन सन २००१ मध्ये शासकीय रुग्णालयात अधिव्याख्याता या पदावर कार्य केले. सन २०१६ मध्ये मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक झाले.

Corona Warrior felicitated by Governor | कोरोना योद्धाचा राज्यपालांकडून सत्कार

कोरोना योद्धाचा राज्यपालांकडून सत्कार

Next
ठळक मुद्देपरिश्रमातून काढले मार्ग : बालपणीच हरपले होते वडिलांचे छत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : जिद्द, मेहनत, चिकाटी हे गुण अंगात असले की मनुष्याच्या जीवनात कितीही चढ-उतार आले की त्या संकटावर मात करू शकतो. अशाच परिस्थितीतून समोर आलेल्या व कोरोना काळात सेवा देत असलेल्या मूळ एकोडी येथील डॉ. सुनील धनराज भैसारे या कोरोना योद्धाचा महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एकोडी येथे गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सुनील भैसारे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. तीन मुले त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आर्इ वर आली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय विद्यालय येथून एमबीबीएसची पदवी घेऊन सन २००१ मध्ये शासकीय रुग्णालयात अधिव्याख्याता या पदावर कार्य केले. सन २०१६ मध्ये मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक झाले. सहा महिन्यांपासून या काळात त्यांनी मुंबई येथे कोरोना योद्धा पथक प्रमुख या पदावर उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या कायार्तून कोरोना संकटांमध्ये अनेकांना मदत मिळाली. त्यांच्या या कामाची दखल राज्य शासनाने घेतली. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते योद्धा ठरलेल्या डॉ. भैसारे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. भैसारे यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ अधिकारी व कोरोना पथकातील सहकारी यांना दिले आहे. विशेष म्हणजे भैसारे यांच्या सन्मानाने साकोली तालुक्यातील एकोडी गावाचा नावलौकिक वाढला आहे.

Web Title: Corona Warrior felicitated by Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.