कोरोनारुग्ण शतकाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:54+5:30

प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी भेट देत क्वारंटाईन असलेल्या इसमांचीही विचारपूस करण्यात आली.

Corona patients on the threshold of the century | कोरोनारुग्ण शतकाच्या उंबरठ्यावर

कोरोनारुग्ण शतकाच्या उंबरठ्यावर

Next
ठळक मुद्देबाधितांची एकूण संख्या ९८ वर : ७९ बाधित झाले कोरोनामुक्त, मंगळवारी मोहाडीत आढळला पुन्हा एक रूग्ण

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊन कालावधीला १०६ दिवस पूर्ण होत असताना भंडारा जिल्ह्यात कोरोनारूग्णांचा ग्राफही वाढत आहे. कोरोना बाधितांची वाटचाल शतकाकडे होत असून आतापर्यंत ९८ रूग्ण आढळले आहेत. २७ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळल्यानंतर ७० दिवसांच्या कालावधीत ९७ रूग्ण आढळले. दुसरीकडे रूग्ण बरे होण्याची टक्केवारीही ८१ इतकी आहे. आतापर्यंत ७९ कोविड रूग्णांना सुटी देण्यात आली आहे.
प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घेऊन घरोघरी भेट देत क्वारंटाईन असलेल्या इसमांचीही विचारपूस करण्यात आली.
कोविड रुग्ण आढळलेल्या दिवसनिहाय आकडेवारीवर नजर घातल्यास गत ६९ दिवसातच ९८ रुग्ण आढळले आहेत. २७ एप्रिलनंतर १७ मे रोजी २ रुग्ण आढळले. त्यानंतर १९, २४ व २६ मे रोजी प्रत्येकी चार रुग्ण आढळले. २८ मे रोजी ५ रुग्ण आढळल्यानंतर एकुण कोविड रुग्णांची संख्या २४ वर पोहचली. त्यानंतर २ जून रोजी ७ रुग्ण आढळल्याने एकुण संख्या ३८ वर पोहचली. १० जून रोजी सहा तर त्यानंतर १७ जूनला पाच रुग्ण आढळले.
सर्वात जास्त रुग्ण म्हणजे १९ जून रोजी १३ कोरोनाबाधित आढळले. यावेळी एकुण बाधितांची संख्या ७१ वर पोहचली. २० जून रोजी चार, २२ व २५ रोजी प्रत्येकी दोन तर २९ जूनला एक रुग्ण आढळला. जुलै महिन्यात एक तारखेला सात, ४ जुलै रोजी सहा तर ६ जुलै रोजी चार रुग्ण आढळल्यानंतर बाधितांची संख्या ९७ इतकी झाली. मंगळवारी मोहाडी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. सदर व्यक्ती २२ वर्षीय असून तो मुंबई येथून आल्याचे सांगण्यात आले. सातही तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ३०५ व्यक्ती भरती असून ३ हजार ८१२ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.
तसेच फल्यू ओपीडी अंतर्गत तिव्र

श्वासदाहचे एकूण १६७ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. यापैकी सर्वांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून १६४ नमुणे निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल अप्राप्त आहे.

परराज्यातून आलेल्यांमुळे वाढले रुग्ण
पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४४ हजार ६३३ व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. त्यापैकी ४१ हजार ४२४ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. आताही अन्य राज्यातून आलेल्या ३ हजार २०९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य व अन्य राज्यातून आलेल्या व्यक्तींमुळेच जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

कन्टेन्मेंट झोनमध्ये ही गावे
जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने भंडारा तालुक्यातील खोकरला आणि साकोली तालुक्यातील धर्मापुरी कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. धर्मापुरी येथे कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले असून कुंभली, सावरबांध ही दोन गावे बफरक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे.

स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,६९९ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी ९८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर ४४०७ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर १९४ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Corona patients on the threshold of the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.