शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प मानधनावर राबतात स्वयंपाकी महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार योजना : केवळ दीड हजार रुपये मिळते मानधन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शालेय पोषण आहार योजनेसाठी राबराब राबणाऱ्या स्वंयपाकी महिलांना अत्याल्प मानधनावर काम करावे लागत असून महागाईच्या काळात त्यांना केवळ दीड हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहर शिजविणाºया महिलांमध्ये असंतोष पसरला आहे.राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळेत गेल्या २२ वर्षांपासून राबविली जात आहे. ग्रामीण भागात सहा ते १४ वयोगटातील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी भोजन दिले जाते. आहार शिजविण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार महिला स्वयंपाकीची निवड शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन केली जाते. भंडारा जिल्ह्यात दोन हजारांच्या वर स्वयंपाकी शाळातून कार्यरत आहेत. स्वयंपाकींना दरमहा हजार रुपये मानधन दिले जात होते. एप्रिल २०१९ पासून शिक्षण विभागाने निर्णय घेऊन त्यांचे मानधन दीड हजार रुपये केले.स्वयंपाकी महिलांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. शाळासुरु झाल्यापासून म्हणजे सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामे करावी लागतात. शासनाने किमान वेतन कायदा तयार केला. परंतु आहार शिजविणाºया स्वयंपाकींना अल्प मानधनावर राबवून शासन त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे दिसून येते. आहार शिजविणाºया महिला स्वयंपाकी या एक कर्मचारी आहेत. शाळेत आल्यापासून त्या अन्न शिजविण्याचे काम, तांदुळ व धान्याची साफसफाई करणे, विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप, जेवणाच्या जागेवर करणे, आहार वाटपानंतर जागेची साफसफाई करणे, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे, भांड्याची साफसफाई करणे, ताटांची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी भरणे, विद्यार्थ्यांना पाणी देणे, अन्न शिजविणाºया यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवण्याचे कामे स्वयंपाकींना करावे लागते. सदर कामे दिवसभर चालतात.स्वयंपाकींना दरमहा पाच हजार रुपये मानधनाऐवजी किमान वेतन, सामाजिक सुरक्षतेच्या योजना स्वयंपाकीसाठी राबविणे, त्यांना गणवेश व परिचय पत्र देण्याच्या मागण्या स्वयंपाकीच्या आयटक प्रणित पोषण आहार कर्मचारी युनियनद्वारे करण्यात आलेले आहेत.महिला मागणार शासनाकडे दादआहार शिजविणाºया कर्मचाऱ्यांना वर्षभरातून दहा महिन्याचे मानधन दिले जाते. त्यांच्या निवडीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहेत. शालेय प्रशासनाकडून शाळेची कामे स्वयंपाकी महिलाकडून केली जातात. काही ठिकाणी अभद्र वागणुकही दिली जाते. अन्य मानधनावर काम केल्यामुळे त्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सदर महिलांना न्याय मिळावा याकरिता शासनाकडे महिला स्वयंपाकी दाद मागत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र