शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:32+5:30

तुरपिकावर शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा अळी या नावाने ओळखली जात असून ती बहुबक्षी कीड आहे ती शेंगांचे अतोनात नुकसान करते. अळी लहान असताना फुलोऱ्यावर तर मोठी असताना शेंगावर आक्रमण करते. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

Control the peanut larvae | शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करा

शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करा

ठळक मुद्देशांतीलाल गायधने : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे बांध्यावर जाऊन मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तूरपिकावरील कीड रोग नियंत्रणााठी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी शेतकºयांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे प्रतिपादन कृषी विभागाचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले.
पवनी तालुक्यात तूरपिकाची पाहणी करताना उपविभागीय कृषि अधिकारी मिलींद लाड, तालुका अधिकारी अविनाश कोटांगले, साकोली कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.श्यामकुवर उपस्थित होते. यावेळी तंत्र अधिकारी गायधने यांनी शेतकऱ्यांना तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांवर मार्गदर्शन केले. तुरपिकावर शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा अळी या नावाने ओळखली जात असून ती बहुबक्षी कीड आहे ती शेंगांचे अतोनात नुकसान करते. अळी लहान असताना फुलोऱ्यावर तर मोठी असताना शेंगावर आक्रमण करते. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून प्रभावी व्यवस्थापनाकरिता एच. ए. एन. पी.व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, अर्धालीटर पाण्यात ५०० ग्रॅम रानी पॉल टाकून हे द्रावण १ मिली प्रती लीटरप्रमाणे मिसळूर फवारावे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावर इमामेक्टीन बेझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिळसून फवारावे. शेंगा पोखरणाºया अळ्यासाठी इन्डोक्साकार्ब १४.५ टक्के हेक्टरी ४०० मिली किंवा इन्डोक्साकार्ब १५.८ टक्के हेक्टरी वापरता येईल. तुरीच्या शेंगावर माशी दिसताच अळी पांढऱ्या रंगाची व गुळगुळीत असल्याची खात्री करता येते.
प्रार्दुभावाचे लक्षण दिसून येत नसल्याने अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी तुरीच्या शेंगांना छिद्रे पाडतात. तेव्हाच नुकसान झाल्याचे लक्षात येते. शेंगमाशी जास्त नुकसान करत असल्याने तूरपिकाच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सी. २० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिळसून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, भंडाराचे मिलिंद लाड यांनी केले आहे.

Web Title: Control the peanut larvae

टॅग्स :agricultureशेती