शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकमुळे उड्डाण पुलाचे बांधकाम आले वांद्यात ?

By admin | Updated: December 6, 2014 22:41 IST

युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे ट्रॅकमुळे झालेल्या अडचणीमुळे तुमसररोड रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे बांधकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे काही कॉलम

तुमसर : युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे ट्रॅकमुळे झालेल्या अडचणीमुळे तुमसररोड रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे बांधकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे काही कॉलम या टॅ्रकवर येत आहेत. नकाशा तयार करताना ट्रॅक कसा लक्षात आले नाही, याची चाचपणी सुरू आहे.
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्ग तथा तुमसर-रामटेक-गोंदिया राज्य मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्थानकाजवळ थ्री कॅबीन ५३२ वर उड्डाण पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. मागील १५ वर्षापासून येथे उड्डाण पुलाची मागणी होत आहे. केंद्र व राज्य शासन येथे उड्डाण पूल तयार करण्याकरिता संमती दिली. ४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पुल बांधकामाचा खर्च ६० टक्के राज्य शासन व ४० टक्के केंद्र शासन करणार आहे. टॅ्रकवरील उड्डाण पुलाचे बांधकाम रेल्वे तर दोन्ही अ‍ॅप्रोच रस्ता राज्य शासन तयार करणार आहे.
केंद्र (रेल्वे) व राज्य शासनाचे वरिष्ठ स्थापत्य अभियंत्याच्या अनेकदा संयुक्त बैठकी झाल्या. नकाशाला विविध मंजुरी घेतल्या. रेल्वेच्या अखत्यारातील मुख्य तांत्रिक अडचण युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे टॅ्रकमुळे निर्माण झाली. प्रत्यक्ष बांधकामाच्या अंतिम सर्वेक्षणाकरिता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तथा स्थापत्य अभियंते २० दिवसापूर्वी येऊन गेले. त्यांनी युनिव्हर्सल फेरोचे रेल्वे ट्रॅक काढण्याचा आदेश दिला होता. त्याला युनिव्हर्सल व्यवस्थापनाने विरोध केला. हा रेल्वे ट्रॅक निरुपयोगी नाही. रेल्वेला दरवर्षी नियमाप्रमाणे आम्ही महसूल देतो. हा आमचा खासगी ट्रॅक आहे. हा ट्रॅक सुमारे २० ते २५ वर्षापूर्वी रेल्वेच्या परवानगीनेच टाकण्यात आला होता, याची माहिती रेल्वे मंत्रालयाला देण्यात आल्याचे सांगितले.
युनिव्हर्सलच्या या भूमिकेनंतर रेल्वेचे अधिकारी आल्यापावली माघारी फिरले. रेल्वेने आपल्या हद्दीतील कॅबीनजवळील दुसरे ट्रॅक येथे काढले आहे. रेल्वेने उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी देताना हा ट्रॅक अडचणीचा ठरेल हे कसे लक्षात आले नाही. हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.
एरव्ही नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यावेळी अनभिज्ञ कसे राहिले? पुन्हा नवीन नकाशा करुन मंजुरीचा ससेजिरा लागेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. (तालुका प्रतिनिधी)