काँग्रेसचे जलसंपदा मत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:28+5:302021-02-05T08:39:28+5:30

भंडारा तालुक्यामधील मौजा दवडीपार बाजार येथे टेकेपार उपसा सिंचन योजनेंतर्गत संपूर्ण गावाला शेतीकरिता सिंचनाची सोय होत नाही व दवडीपार ...

Congress's statement to water resources ministers | काँग्रेसचे जलसंपदा मत्र्यांना निवेदन

काँग्रेसचे जलसंपदा मत्र्यांना निवेदन

भंडारा तालुक्यामधील मौजा दवडीपार बाजार येथे टेकेपार उपसा सिंचन योजनेंतर्गत संपूर्ण गावाला शेतीकरिता सिंचनाची सोय होत नाही व दवडीपार बाजार येथील २०० ते ३०० हेक्टर जागा ही सिंचनाअभावी पडीक राहाते. दवडीपार बाजार येथे टेकेपार उपसा सिंचन योजनेचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्या मुख्य कालव्यातून दवडीपार येथील तलावात नवीन नहर बांधकाम केल्यास संपूर्ण दवडीपार बाजार येथील शेतकऱ्यांना शेतीकरिता सिंचनाची सोय उपलब्ध होईल, याकरिता जलसंपदा मंत्री यांना प्रसन्न चकोले यांच्या नेतृत्त्वाखाली निवेदन देण्यात आले. जलसंपदा मंत्री यांनी विषयाचे गाभीर्य लक्षात घेता दवडीपार बाजार येथील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय व्हावी, याकरिता अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, आंबाडी यांना त्वरित मुख्य कालव्यापासून ते तलावापर्यंत नहराचे सर्वेक्षण करून तत्काळ बांधकाम करावे, असे निर्देश दिले. प्रसन्न चकोले, भागवत हजारे, उपसरपंच दवडीपार बाजार, इरफान पठान, पंकज धुर्वे, शशांत लांजेवार व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Congress's statement to water resources ministers