शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसेस सीएम’नी दिले काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘बाळकडू’

By admin | Updated: June 28, 2014 00:56 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरीता ...

तुमसर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरीता राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशिला चव्हाण यांनी आता मोर्चा सांभाळला आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांसाठी तुमसर येथे शिबिर आयोजित करुन त्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिराची माहिती पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आली होती. केवळ निमंत्रितांनाच याठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. तुमसर येथे आज, शुक्रवारी सकाळी १० ते ५ या वेळेत मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात आगामी निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याविषयी माहिती देण्यात आली. चव्हाण यांच्यासोबत निवडक राजकीय सल्लागार, मिडिया प्रचार व प्रसारविषयक तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आॅक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. याची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेऊन या शिबिरात मंथन करण्यात आले.
काँग्रेसने केलेली लोकोपयोगी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे, जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे, निवडणूक प्रचार व प्रचाराचे टप्पे, शेवटच्या दहा दिवसात प्रचारात आक्रमकता आणने यावर सत्वशिला चव्हाण यांनी व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात भंडारा जिल्ह्यातील ८० व गोंदिया जिल्ह्यातील १२० निवडक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे वरीष्ठ पदाधिकारी व काँग्रेसचे आमदार या शिबिरात दिसले नाही. तुमसर पोलिसांनासुद्धा या शिबिराची अधिकृत माहिती नव्हती. (तालुका प्रतिनिधी)