शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष माणसाला जगण्याचे बळ देतोे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले. लाखनी येथील द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा वनवे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक संजय वनवे, आशिष बडगे, प्रशांत वाघाये उपस्थित होते.

ठळक मुद्देतुषार उमाळे : लाखनी येथील लिटील फ्लावर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : माणसाच्या जीवनात आलेला संघर्ष माणसाला जगण्याचे बळ देते. त्यामुळे संघर्ष करण्याची तयारी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आपली असली पाहिजे. जगातील अनेक यशस्वी लोकांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे आणि संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्व हे जगाच्या पाठीवर कायम यशस्वी राहिलेले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तुषार उमाळे यांनी केले.
लाखनी येथील द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा वनवे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक संजय वनवे, आशिष बडगे, प्रशांत वाघाये उपस्थित होते.
प्रा. तुषार उमाळे म्हणाले, विद्यार्थी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर विद्यार्थी जीवनात मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात तुमचं ध्येय ठरवा, जोपर्यंत आपलं ध्येय ठरवलं नसनार तोपर्यन्त आपल्या प्रवासाला दिशा नसेल म्हणून ध्येय ठरवून मोठी स्वप्न बघा आणि त्यांना प्रत्यक्षात उतरवन्यासाठी प्रामाणिक झोकुन देऊन प्रयत्न करा, एक दिवस तुम्ही नक्की यशाला गवसणी घातलेली असेल.
आज सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र इतिहासात काहीही साधनं उपलब्ध नसलेल्या अनेक लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष करून स्वत:ला सिद्ध केलं आणि जगाने त्यांची दखल घेतली. आपण अशा व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्य उज्वल होण्याच्या दृष्टीने प्रवास करायला पाहिजे.
मुख्याध्यापिका आशा वनवे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपली पकड त्या त्या विषयावर बसवली पाहिजे. सर्व महापुरुषांच्या जीवन प्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या आपल्या जीवनात आपण अमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशांत वाघाये यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची उपयुक्तता सांगितली.
संचालन सामिग्रा वनवे, तर आभार प्रदर्शन वैभव उपासे यांनी केले. कार्यक्रमासाठी वर्षा पंचबुद्धे, याह्या आकबानी, मिनाक्षी डोरले, प्रिया ठाकरे, पुष्पा मानकर, प्रतिक्षा बंसोड, स्वाती ढेंगे, छाया बावनकुळे, पूजा गोतमारे, कृष्णा उइके, फातिमा शेख यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा