शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता वाढली : बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By admin | Updated: July 14, 2014 00:25 IST

बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पावसाची प्रतीक्षा
रंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा)

बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यास यंत्रणेला यश आले आहे. नदी पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्पाला पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत नदीचे पात्र कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प नदी पात्रातून सन २००७ पासून पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात करीत आहे. या जलाशयात साठवणूक करण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला खरीप आणि रब्बी हंगामात वाटप होत आहे. यामुळे शेतकरी या प्रकल्पाकडे आशान्वीत आहेत. परंतु या प्रकल्पात निधी अभावी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. दुष्काळसदृष्य परिस्थितीत हा प्रकल्प १४ हेक्टर शेतीला जीवनदायी ठरणारा आहे. परंतु तसे नियोजन नाही. या प्रकल्पस्थळात पावसाळा तोंडावर असताना बॅटऱ्या दुरुस्त नाही. या शिवाय टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. लक्षावधी निधीचा खर्च असताना उपलब्ध करण्यात आलेला नाही. यामुळे यंदा नदी पात्रातून प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही असा संशय शेतकऱ्यांना निर्माण झाला. प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले. यामुळे यंत्रणा खळबडून जागी झाली. या संदर्भात लोकमतने सातत्याने वृत्त प्रकाशित करीत या प्रकल्पाची व्यथा जनता आणि यंत्रणेच्या दरबारात मांडली.
प्रकल्पातील समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी यंत्रणेने मनावर घेतले. प्रकल्प स्थळातच अधिकाऱ्यांनी ठाण मांडले. नादुरुस्त बॅटऱ्याची शोध मोहीम राबविली. यात ३ नवीन बॅटऱ्याची सोय करण्यात आली आहे. सध्यास्थित असलेल्या बॅटऱ्या, पंपगृहाला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहे. ही अडचण निकाली काढण्यात आली असली तरी यंत्रणेने नवीन बॅटऱ्या पुरवठा करण्यासाठी वरिष्ठांना पाठपुरावा सुरु केला आहे. या प्रकल्पस्थळांच्या टाकीत असलेली गाळ काढण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या प्रमुख दोन समस्या निकाली काढण्यात आल्याने यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करण्यास सज्ज आहे. परंतु पावसाळा कोरडा जात असल्याने नदी पात्रात पाणी नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्याआहेत.
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम तोंडावर असल्याने धानाची नर्सरी घातली आहे. या नर्सरीला जीवंत ठेवण्यासाठी कसरत सुरु झाली आहे. चांदपूर जलाशयात गत वर्षीचे शिल्लक असलेले पाणी धानाच्या नर्सरीकरिता वाटप करण्यात आले आहे. हे पाणी आता संपले आहे. ६ फुट पाणी जलाशयात असल्याने पाणी वाटप बंद करण्यात आले आहे. आता या धानाच्या नर्सरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहेत. परंतु पावसाचा थांगपत्ता नाही. येत्या १० दिवसात पावसाची हजेरी नसल्यास भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण होणार आहेत. या धानाच्या नर्सरी करपल्यास जलाशयाचे पाणी वाटपाचे महत्व राहणार नाही. परिसरात दुष्काळावर आंशीकरित्या मात करण्यासाठी आता सोंड्याटोला प्रकल्पाला राजीव सागर (बावनथडी प्रकल्पाचे) पाणी देण्याची गरज आहे. हा पाणी शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार आहे.