शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड सेंटरचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

भंडारा शहरासह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या असून वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या मिशनसोबतच मृत्यु संख्या आटोक्यात ठेवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. काँटेक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे.

ठळक मुद्देउपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना : कोरोनाला न घाबरता काळजी घेण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना प्रार्दुभावाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या उपाय योजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.भंडारा शहरासह ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य विभागाने उपाय योजना केल्या असून वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह या मिशनसोबतच मृत्यु संख्या आटोक्यात ठेवण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. काँटेक्ट ट्रेसिंगवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. मोठया प्रमाणात संपर्क शोध केल्यास प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. या बैठकीत जिल्हयात वृध्द असलेल्या शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेड्सचा आढावा घेण्यात आला.नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार केल्यास व मास्कचा वापर केल्यास कोरोना संसगार्पासून बचाव शक्य आहे, असे ते म्हणाले. आवश्यकता नसतांना प्रवास करण्याचे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांची कोविड केअर सेंटरला भेटशहापूर जवळील राजेदहेगाव येथे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह इमारतीत असलेल्या कोविड केअर सेंटरला गुरुवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांचेसोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते उपस्थित होते. सुरक्षित अंतर राखून जिल्हाधिकाºयांनी रुग्णांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोविड केअर सेंटरमध्ये सॅनिटायझर, पिण्याचे गरम पाणी आदी सुविधा पुरविण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या. कोरोना आजाराला न घाबरता काळजी घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योगा करण्याचा सल्ला जिल्हाधिकाºयांनी दिला. कुठलीही अडचण आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी