शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

आधी बंद, दुपारनंतर भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम्यान पोत्यात बंद असलेला भाजीपाला खराब होवून नुकसानीबाबत चिंता सतावणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केली.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी उपाययोजना : जिल्ह्यात अन्य ठिकाणीही तशीच स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात आठवडी बाजार भरू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र तुमसरात सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्र्यंत भाजी दुकाने बंद होती, परंतु त्यानंतर नियमितरित्या आठवडी बाजार भरला. आदेशानंतरही आठवडी बाजार भरल्याने चर्चा रंगली होती. मात्र ज्या भाजी विक्रेत्यांना या निर्णयाबाबत माहिती नाही, त्याबाबत कारवाई करावी काय, असा प्रश्नही निर्माण झाला. जिल्हाभरात अनेक ठिकाणी मंगळवारी बाजार भरत असतो. तुमसरातही मंगळवारी बाजार भरतो. परंतु दुपारनंतर या आदेशाला हरताळ फासल्या गेल्याचे दिसून आले.
सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम्यान पोत्यात बंद असलेला भाजीपाला खराब होवून नुकसानीबाबत चिंता सतावणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केली. पोलीस प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याकरिता बाजारात फिरून आवाहन केले होते. परंतु प्रशासनाने किमान दोन दिवसांपुर्वीतरी सूचना का दिली नाही, असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे होते. बाजारपेठेत आलेल्या भाज्या बेवारस फेकून द्यायच्या काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. देव्हाडी मार्गावरही भाजी विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. आजचा दिवस वगळता पुढच्या आठवड्यापासून आठवडी बाजार बंद राहील, अशी चर्चाच सायंकाळच्या सुमारास बाजारात ऐकावयास मिळाली.

कोरोनावर उपायांसाठी पालांदूर पोलीस ठाणे सरसावले
पालांदूर : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूजन्य आजाराची सरळतेने माहिती सर्वसामान्यांना व्हावी, अफवांवर विश्वास न ठेवता सर्वसामान्यांना आरोग्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी, प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या कर्तव्यात प्रामाणिकता ठेवावी, या हेतूने पालांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंबादास तुंगार यांनी बैठकीचे आयोजन करून पोलीस पाटलांना विषाणूजन्य कॉरोना विषयात प्रबोधन केले. गरज नसताना घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रसंगानुरुप जाणे झाल्यास खिशात रुमाल असावे शिंक किंवा खोकला आल्यास तोंडा नाकासमोर रुमाल घ्यावी, दिवसातून चार-पाच वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावे, बाहेरून घरी आल्यास प्रथमता पाण्याने हातपाय स्वच्छ धुऊन नंतरच घरात प्रवेश करावा, समाजामध्ये चुकीचे विषय कोरोना अनुषंगाने पसरले जातात याकडे लक्ष देऊन जे आरोग्य विभागाने सुचवलेल्या सूचना आहेत त्यांची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असे अंबादास सूनगार यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिली. बाहेरगावावरून आलेली एखादी व्यक्ती आपणास कुरुंदा बाधित किंवा तत्सम लक्षणे आढळल्यास संबंधित आरोग्य विभागाकडे समस्य ठेवावी कुणालाही न घाबरवता सहकार्याच्या भावनेने मदत करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

शहापुरात जागा बदलली
शहापूर : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर स्थानिक आठवडी बाजार मुळ जागेवर न भरता स्थानांतरीत झाला. प्रशासनानेच सकाळपासूनच भाजी विक्रेत्यांना नेहमीच्या जागेवर बसण्यास मज्जाव केला. सायंकाळनंतर आठवडी बाजार भंडारा-नागपूर मार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या नांदोरा मार्गावर भरला.

लाखनीच्या आठवडी बाजारात गर्दी
लाखनी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे १६ मार्चला पत्रान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत नगरपंचायत क्षेत्रात भरणाºया आठवडी बाजारात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार लाखनी येथील मंगळवारी भरणाºया आठवडी बाजार बंद करण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाने केला. परंतु व्यापारी व किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने आठवडी बाजारात संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
सोमवारी रात्री मोठ्या बाजारपेठेतून लाखनीच्या बाजारात शेतमाल आलेला होता. तसेच आज पहाटेपासून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा माल भाजी बाजारात आलेला होता. किरकोळ विक्रेत्यांचा माल भाजीबाजारात आलेला होता. किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी ८ ते १० पर्यंत खरेदी करून सकाळी ११ वाजेपासून भाजीपाल्याची दुकाने बाजारात लागलेली होती. लाखनीच्या आठवडी बाजारात १०० पेक्षा जास्त गावचे लोक भाजीपाला व इतर वस्तु खरेदीसाठी येत असतात. मंगळवारचा आठवडी बाजार हा ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी महत्वपूर्ण असतो. कोट्यावधी रूपयाची उलाढाल होत असते. नगरपंचायत व बाजार समितीला यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार