शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

दारूची अवैध विक्री बंद करा

By admin | Updated: August 23, 2014 23:49 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बाक्टी/चान्ना येथील अवैधरित्या सुरू असलेली मोहफुलांची व देशी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे.

बोंडगावदेवी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बाक्टी/चान्ना येथील अवैधरित्या सुरू असलेली मोहफुलांची व देशी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे. बाक्टी येथील गोवर्धन बडवाईक ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम राबवितात. गावातील पानटपरीवरसुद्धा जमलेल्या लोकांना प्रबोधन करतात. सातत्याने समाजहित्याच्या गोष्टी सांगून लोकोपयोगी कामे करण्यात त्यांना स्वारस्य आहे. गावात मोठ्या प्रमाणात मोहफुलांची दारू हातभट्टीच्या माध्यमातून काढली जाते. जवळपास ५० लोक या व्यवसायात गुंतले आहेत. गावच्या चारही बाजूला मोहफुलांची व देशी दारू सहज उपलब्ध होत असते. दारूच्या आहारी अख्खे कुटूंब गेल्याचे चित्र आजही गावात दिसत आहे. ‘हातावर कमवून पानावर खाणारे’ सर्वसाधारण कुटुंबामध्येच व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गावात सर्वत्र तसेच दर्शनी स्थळी सहजरीत्या मोहफुलांची दारू व देशी दारू उपलब्ध असल्याने बाक्टी गावाशेजारील तसेच काही अंतरावरून शौकीनबाजांची रीघ लागते. दारूचा डोज जास्त झाल्याने अनेकांना नशेच्या गुंगीने स्वत:च्या गावी जाणे अवघड होवून रस्त्यामध्ये काही शौकीनबाज लोक पडल्याचे अनेकदा घडले. काहींना त्यांच्या घरी सुखरूपपणे नेवून दिल्याचे समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले. काहींनी आपला वंशपरंपरागत व्यवसाय म्हणून मोहफुलांच्या दारू विक्रीवर जोर देवून चांगलाच जम बसविल्याचे दिसते. दिवसेंदिवस अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ होत आहे. शारीरिक त्रासाचा लवलेशही या व्यावसायिकांना लागत नसल्याने गावात अवैध मोहफुलांच्या दारू विक्रीसह देशी दारू विक्रीलाही उधाण आल्याचे चित्र दिसत आहे. शौकीनबाज कुटुंबाच्या घरी अठराविश्वे दरिद्रता व भांडणाचा कलह दिसून येतो. दारूच्या व्यसनामुळे कित्येक कुटुंबांची वाताहत झाल्याचे दिसते. बाक्टी गावात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी युवक वर्गाकडून तसेच संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न केला गेला. काही दिवस जरब बसला. परंतु अवैध दारू विक्रीवर आळा घालणाऱ्या संबंधित यंत्रणेने आपला कासरा ढिला केल्याने पुन्हा धंदा करणाऱ्यांची छाती फुलली. दारूसाठी आवश्यक असलेली मोहफुले घरपोच मिळण्याची सोय असल्याने या धंद्यामध्ये आणखी वाढ होत आहे. युवकवर्ग व्यसनाधिनतेकडे वळत आहे. गावात शांतता व समृद्धी नांदण्यासाठी बाक्टी गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे. (वार्ताहर)