शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

दिघोरी-लाखांदूर रस्त्याच्या कामाने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : निकृष्ट काम होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : साकोली ते वडसा या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असल्याने दिघोरी, लाखांदूर, सोनी, चप्राड परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम करून मुरुमाचा भराव टाकल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल तर काही ठिकाणी धूळीचे लोट उडत असल्याने नागरिक गत काही दिवसापासून त्रस्त झाले आहेत.रस्त्यावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणात धूळ तर काही ठिकाणी चिखल उडत आहे. त्याचा वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून ते हैराण झाले आहेत. धुळीचे प्रमाण वाढले असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत.वाहनचालकांना दिवसाही लाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतो. सध्या रस्त्यावर भरावाचे काम सुरू असताना धूळ उडू नये, म्हणून कंत्राटदार कंपनीकडून रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना टाळाटाळ करत होता. याबाबत विचारणा करण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.काही ठिकाणी चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात आवश्यक तितकी सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.अल्पावधीतच रस्त्याला पडल्या भेगालाखांदूर ते दिघोरीपर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम जोमाने सुरू आहे, मात्र बांधकामात गैरप्रकार होत असल्याने बांधकाम निकृष्ट होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. चिचाळ, बारव्हा, दिघोरी येथील नुकताच झालेल्या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत, या मार्गावरून जड वाहतूक बंद आहे, तरीदेखील अल्पावधीतच भेगा पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार आहे याचा प्रत्यय येत असल्याने रस्ते कामावर बारव्हा परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या निकृष्ट बांधकामाची निष्पक्षपणे चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा