शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक औषधींच्या नावावर नागरिकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, कर्जत, बदलापूर या आदिवासी भागातून औषधी वनस्पती मिळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंडे अँकर । भोंदू वैद्यांचा सुळसुळाट, गावठी औषधांचा व्यवसाय राजरोसपणे सुरु, आरोग्य धोक्यात

रवींद्र चन्नेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्याचे औषध मिळाले तर ते प्रत्येकालाच हवे असते. या औषधांनी आजार तर बरा होतो. परंतु, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे बऱ्याचदा रूग्णास साईड इफेक्टची भीती नसलेल्या आयुर्वेदीक औषधांचा आधार घेतात. लाखांदूर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात रस्त्यावर गाड्या उभ्या करून किंवा तंबू ठोकून औषधी वनस्पतींपासून औषधे बनविण्याचे सांगून नागरिकांची सर्रास लूट करणाºया भोंदू वैद्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास उपचार करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे.आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, कर्जत, बदलापूर या आदिवासी भागातून औषधी वनस्पती मिळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.जर त्या विक्रेत्यांकडे औषधी विकण्याचे परवाने असेल तर ते औषधी विकू शकतात. पण, औषधी स्वत: तयार करून नागरिकांना विकत असेल तर अशांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.आर्थिक लुबाडणूकआयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन हे भोंदू वैद्य नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करतात. या औषधांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये गुप्तरोग आणि लैंगिक समस्यांनी त्रस्त असणाºया रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. लाखांदूर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात रस्त्यावर गाड्या उभ्या करून किंवा तंबू ठोकून औषधी विक्री होत आहे.प्रशासनासमोर आव्हानप्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही. इतकेच नव्हे तर उपचारही योग्यरित्या होतात. आयुवेर्दीक औषधांची दुकाने थाटणाऱ्यांची पोलिसांनी परवाने तपासण्याची गरज आहे. बनावटी व्यक्तीवर कारवाईची करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागा समोर निर्माण झाले आहे.

टॅग्स :medicineऔषधंfraudधोकेबाजी