शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर धडकलेला चितळ स्कूलबसखाली चिरडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST

राज्यमार्गावर गाेबरवाही जंगलात अचानक एक चितळ आले आणि दुचाकीवर धडकले. त्यामुळे दुचाकीसह भक्तराज खाली काेसळला. त्याचवेळी मागून एक स्कूलबस आली. या स्कूलबसने दुचाकीला धडक देत चितळाला चिरडले. बसची धडक एवढी भीषण हाेती की दुचाकी २० फूट बससाेबत फरफटत गेली. सुदैवाने भक्तराज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काेसळल्याने त्याला दुखापत झाली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कपवनारा : भरधाव दुचाकीवर अचानक धडकलेला चितळ स्कूलबसखाली चिरडून ठार झाल्याची घटना तुमसर - नाकाडाेंगरी राज्य मार्गावर गाेबरवाही जंगलात गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली नाही.तुमसर तालुक्यातील पाथरी येथील भक्तराज तुलाराम पंचीपात्रे (३१) हा गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच ३६ ई ८२९८) तुमसरकडे जात हाेता. त्यावेळी राज्यमार्गावर गाेबरवाही जंगलात अचानक एक चितळ आले आणि दुचाकीवर धडकले. त्यामुळे दुचाकीसह भक्तराज खाली काेसळला. त्याचवेळी मागून एक स्कूलबस आली. या स्कूलबसने दुचाकीला धडक देत चितळाला चिरडले. बसची धडक एवढी भीषण हाेती की दुचाकी २० फूट बससाेबत फरफटत गेली. सुदैवाने भक्तराज रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काेसळल्याने त्याला दुखापत झाली नाही.या अपघाताची माहिती हाेताच वनकर्मचारी बी. बी. गेडाम, एल. व्ही. बाेरकर, एल. एस. लाडेकर, बी. टी. नागरीकर, डी. जे. गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातानंतर स्कुलबस पसार झाली. या अपघाताची माहिती भक्तराजने आपल्या नातेवाईकांना दिली. त्यावरुन त्यांनी घटनास्थळ गाठले. राज्य मार्गालगत जंगल असल्याने अचानक वन्यप्राणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असे अपघात हाेतात. वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे.

वन्यप्राण्यांचा मुक्त संचारराज्यमार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातील वन्यप्राणी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर येतात. या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकाची नजरचुक झाली की अपघाताची भीती असते.

 

टॅग्स :Accidentअपघातforest departmentवनविभाग