शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल होणार

By admin | Updated: September 14, 2014 23:53 IST

तुमसर रोड (देव्हाडी) येथे बनावट नोटा छपाई प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध दि. १६ रोजी नागपूर एटीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे. नाशिक येथून नोटांचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार

प्रकरण बनावट नोटांचे : नाशिक येथून येणार अहवालतुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे बनावट नोटा छपाई प्रकरणातील सहा आरोपींविरुद्ध दि. १६ रोजी नागपूर एटीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे. नाशिक येथून नोटांचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथून नोटा छपाई यंत्राची तपासणी अहवालनंतर न्यायालयात सादर केला जाणार असल्याचे कळते.दि. २४ जुलै रोजी मध्यरात्री नागपूर एटीएस पथकाने तुमसर रोड (देव्हाडी) येथून बनावट नोटा छपाईच्या यंत्रासह बंटी दवारे (२८) रा.गांधी वॉर्ड, विजय लिल्हारे (३०) रा.नेहरु वॉर्ड व छोटू मेश्राम (३०) रा.स्टेशनटोली यांना अटक केली होती. या टोळीने नागपूर येथे नकली नोटा चलनात आणल्या होत्या. त्याची सत्यता लक्षात आल्यावर एटीएसने सापळा रचला. यात नागपूर येथील गणेश उर्फ उदयसिंह निमजे याला ३ लाख २२ हजार ५०० च्या बनावट नोटा जप्त करून अटक केली होती. या प्रकरणात बनावट नोटांचे तार देव्हाडी येथे असल्याची माहिती गणेश निमजे याने तपासात दिली होती.दि. ३० आॅगस्टपर्यंत नागपूर एटीएसने आरोपींची पोलीस कोठडी घेतली होती. दरम्यान तपासात चार आरोपींपैकी नागपूर येथील दिनेश कडू व दिपक पाठराबे यांचा रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती दिली. या सहा आरोपीविरुद्ध नागपूर एटीएस दि. १६ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करीत आहे. दरम्यान नागपूर एटीएसने बनावट नोटा नाशिक व नोटा छपाई यंत्र मुंबई येथे तपासणीकरिता पाठविले आहे. यात नोटांचा अहवाल प्राप्त करण्याकरिता एटीएसचे अधिकारी नाशिकला रवाना झाले आहेत. सोमवारी रात्री अथवा मंगळवारी अहवाल नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. या वृताला एटीएसचे पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी दुजोरा दिला. नोटा छपाई अहवाल मुंबई येथून प्राप्त झाल्यावर तो न्यायालयात नंतर सादर करण्यात येईल अशी माहिती एटीएसचे मंगेश देसाई यांनी दिली. दोन महिन्यात न्यायालयात आरोपपत्र सादर करावे लागते. २४ जुलै रोजी आरोपींना अटक केल्यावर आरोपींकडून प्रत्येक बिंदूवर कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरोपींविरुद्ध कलम ४८९ (क), १२० (ब) तथा ४२० भांदवीच्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)