शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भराव करण्यात आला नाही. सदर शहरातील हा प्रभाग घरांच्या गर्दीचा आहे.

ठळक मुद्देवर्दळीचा रस्ता : रहदारीलाही अडथळा, नागरिकांमध्ये प्रचंड रोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विकासाच्या कामात रस्ते हे सशक्त माध्यम आहे. रस्ते सुरक्षित असावे, असा नियम आहे, परंतु नऊ महिन्यांपासून तुमसर शहरात बांधकाम झालेला सिमेंट रस्ता नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. शहरातील मुक्ताबाई शाळा ते नांगी चौकापर्यंत असलेला सिमेंट रस्ता उंच असून रस्त्याशेजारी दोन्ही बाजूला मोकळ्या जागेत भराव न केल्याने रस्त्याच्या कडा धोकादायक ठरत आहे.या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत. मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भराव करण्यात आला नाही. सदर शहरातील हा प्रभाग घरांच्या गर्दीचा आहे.सदर सिमेंट रस्ता बांधकाम झाल्यानंतर इतर महत्वपूर्ण कामे येथे करण्यात आली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता बांधकामानंतर पेवर व भरावाची नितांत गरज होती. स्थानिक काही नागरिकांनी घरी जाण्यासाठी मातीचा भराव घालून व्यवस्था केली. नागरिकांना वाहने काढताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जीव धोक्यात घालूनच वयोवृद्ध लोकांना मार्गक्रमण करावे लागत आहे, हे येथे उल्लेखनीय.सदर सीमेंट रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या विषयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी. एल. शुक्ला यांना दि. ६ जुलै सोमवार रोजी सादर करण्यात आला. तसेच या निवेदनाची प्रत राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमीत मेश्राम, माजी उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख मनोहर गायधने, सतीश बन्सोड, पारस भुसारी, आनंद बनकर उपस्थित होते.अभियंत्यांचे आश्वासनसदर सीमेंट रस्त्याचा दोन्ही बाजूला मोकळ्या जागेत लवकरच भराव टाकून पेवर ब्लॉग बसविण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपविभागीय अभियंतानी दिले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.?

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा