सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:54+5:30

मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भराव करण्यात आला नाही. सदर शहरातील हा प्रभाग घरांच्या गर्दीचा आहे.

Cement roadside dangerous | सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक

सीमेंट रस्त्याची कडा धोकादायक

googlenewsNext
ठळक मुद्देवर्दळीचा रस्ता : रहदारीलाही अडथळा, नागरिकांमध्ये प्रचंड रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विकासाच्या कामात रस्ते हे सशक्त माध्यम आहे. रस्ते सुरक्षित असावे, असा नियम आहे, परंतु नऊ महिन्यांपासून तुमसर शहरात बांधकाम झालेला सिमेंट रस्ता नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. शहरातील मुक्ताबाई शाळा ते नांगी चौकापर्यंत असलेला सिमेंट रस्ता उंच असून रस्त्याशेजारी दोन्ही बाजूला मोकळ्या जागेत भराव न केल्याने रस्त्याच्या कडा धोकादायक ठरत आहे.
या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत. मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भराव करण्यात आला नाही. सदर शहरातील हा प्रभाग घरांच्या गर्दीचा आहे.
सदर सिमेंट रस्ता बांधकाम झाल्यानंतर इतर महत्वपूर्ण कामे येथे करण्यात आली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता बांधकामानंतर पेवर व भरावाची नितांत गरज होती. स्थानिक काही नागरिकांनी घरी जाण्यासाठी मातीचा भराव घालून व्यवस्था केली. नागरिकांना वाहने काढताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जीव धोक्यात घालूनच वयोवृद्ध लोकांना मार्गक्रमण करावे लागत आहे, हे येथे उल्लेखनीय.
सदर सीमेंट रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या विषयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डी. एल. शुक्ला यांना दि. ६ जुलै सोमवार रोजी सादर करण्यात आला. तसेच या निवेदनाची प्रत राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमीत मेश्राम, माजी उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख मनोहर गायधने, सतीश बन्सोड, पारस भुसारी, आनंद बनकर उपस्थित होते.

अभियंत्यांचे आश्वासन
सदर सीमेंट रस्त्याचा दोन्ही बाजूला मोकळ्या जागेत लवकरच भराव टाकून पेवर ब्लॉग बसविण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपविभागीय अभियंतानी दिले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.?

Web Title: Cement roadside dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.