शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा करा

By admin | Updated: August 31, 2016 00:29 IST

येणाऱ्या सणानिमित्त जिल्ह्यात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे.

विनिता साहू यांचे प्रतिपादन : मद्यपींवर राहणार नजर, जातीय सलोखा समितीची बैठकभंडारा : येणाऱ्या सणानिमित्त जिल्ह्यात शांतता राखण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे. सर्व समान कार्यकर्ते व शांतता समितीच्या अध्यक्षांनी आपापल्या परीने शांतता ठेवावी. आगामी गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करावा असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय जातीय सलोखा समितीच्या बैठकीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय पोलीस अधिकारी संख्ये, पोलीस उपअधीक्षक (गृह) धात्रक, पोलीस निरीक्षक कोरवाडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी साहू यांनी जिल्ह्यात जिथे कुठे काही गुन्हे घडताना दिसत असेल तर त्याची त्वरीत माहिती सिटीझन अ‍ॅप व प्रतिसाद अ‍ॅप किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर सांगावे. घरातील व शेजारील महिलांना सुद्धा डिजीटल अ‍ॅप व प्रतिसाद अ‍ॅपची माहिती द्यावी. उत्सवादरम्यान बॅनर लावताना जे बॅनर सण उत्सव झाल्यानंतर काढत नाही ते काढावे, बॅनरवर प्रिंटरचे नाव व परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बेटी बचाव, बेटी पढाव यानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगतानाच उत्सवा दरम्यान मद्यप्राशन करून धिंगाना घालणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी येणाऱ्या उत्सवांमध्ये सर्वांनी सामंजस्य साधून कार्य करावे प्रत्येक गावात एक गाव एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती अशी संकल्पना आखल्यास कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, जातीय समिती सलोखा सदस्य, दक्षता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.संचालन स्थानिक गुन्हे विभागाचे कोलवाडकर यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी सख्ये यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)