शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांकरिता जाचक अटी रद्द करा

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२००

भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि त्याचे वाटपही सामाजिक न्यायभवनात असलेल्या गोसेखुर्द पुनर्वसन विशेष पॅकेज अंतर्गत वितरण सुरु आहे. परंतु सालेबर्डी, पांधी, पिंडकेपार, खैरी येथील प्रकल्पग्रस्तांवर जाचक अटी लादल्या जात आहेत. त्या जाचक अटी रद्द करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमीनी, घरे, शासनाने राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करून त्यांना मोबदल्याचे नोटीस दिले. नोटीसमधील भूधारक मय्यत असल्यास त्यांच्या वारसांना कीचकट अटींची पूर्तता करावी लागते. मय्यत असल्यास जाहीरनामा प्रकाशित करणे, वारसानाची सहमतीपत्र, इंडेमिटीबाँड या अटींची पूर्तता प्रकल्पग्रस्तांनी मूळ मोबदला मिळाला तेव्हा केली होती. परंतु आता प्रकल्पग्रस्तांना मुळ मोबदला अत्यल्प असल्याने शासनाने १२०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज गोसेखुर्द प्रकल्पासाठी घोषित केले व त्याचे वितरण गोसेखुर्द पुनर्वसन विशेष विभागाची सामान्य क्रमांक १,२,३ अशी विभागाची निर्मिती करून प्रकल्पग्रस्तांना विविध लाभांश चे पॅकेज नोटीस देण्यात आले. नंतर प्रकल्पग्रस्तांनी ते नोटीस तहसील कार्यालय स्थित पाच महिन्यापूर्वी गोसेखुर्द पुनर्वसन कार्यालयात प्रत्येकी १०० रुपयांचे तीन ते चार कोर्ट फी स्टँपपेपरवर शपथपत्र, करारनामा, तलाठी वारसानपत्र, सहमतीपत्राच्या माध्यमातून पाच महिन्यापूर्वी जमा करून दिले व प्रकल्पग्रस्तांकडून बँक खातेही मागितले. परंतु आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही माशी कुठे शिंगली कुणास ठाऊक? याआधी भूसंपादन अधिकारी जोशी यांनी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त गावाचे मय्यत वारसानाची प्रकरणे सह्या करून निकाली काढून त्यांच्या खात्यात दहा दिवसाच्या अवधित संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा केली. सध्या संबंधित कार्यालयाचे भूसंपादन अधिकारीचे कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी बनकर सांभाळत आहेत. त्यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना बोलावून मय्यत वारसानांची माहिती जाणून घेतल्याची माहिती आहे. मय्यत वारसांची प्रकरणे योग्य असल्यास त्यांची प्रकरणे निकाली काढून रक्कम अदा करण्यात यावे अशी मागणी सालेबर्डी, पांधी, खैरी प्रकल्पग्रस्त करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या या समस्येकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कोणत्याही प्रकारचे अटी न लादता इतर भूधारकांचे प्रकरणे निकाली काढून, पॅकेज रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरत आहे. (नगर प्रतिनिधी)