शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

१२२ गावांमध्ये ४१९ घरांची पडझड

By admin | Updated: July 24, 2014 23:42 IST

मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे.

भंडारा : मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे. यात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका तुमसर तालुक्यातील सिंदपुरी या गावाला बसला असून आजही तिथे घरे पाण्यात आहेत.जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दि. २३ जुलै रोजी अनेक मार्ग बंद पडलेले आहेत. यात लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते वडसा मार्गे चप्राड, लाखांदूर, बारव्हा ते तई, दांडेगाव ते मासळ, बोथली ते मासळ हे मार्ग सकाळी ८ वाजेपासून बंद झाले आहेत. मार्ग बंद असल्यामुळे दुसरे पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरु केली आहे. भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते कोरंभी, भिलेवाडा ते सुरेवाडा, करचखेडा ते सिरसघाट, सिंगोरी ते चांदोरी, पहेला ते गोलेवाडी, अर्जुनी ते जामगाव हे मार्ग बंद झालेले आहेत. पवनी तालुक्यातील कोदुर्ली ते भोजापूर मार्ग सकाळी ११ वाजता बंद झाले आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी ते तुमसर मार्ग बंद झाले होते. साकोली तालुक्यातील पळसगाव ते सुकळी मार्ग, विर्सीफाटा ते विर्सी मार्ग दुपारी १२ वाजता बंद झाले. तुमसर तालुक्यातील वाहणी ते परसवाडा, सिलेगाव ते परसवाडा, वाहनी ते सिलेगाव हे मार्ग बंद आहेत. मोहाडी तालुक्यातील टांगा ते विहिरगाव, रोहा ते रोहणा, मोहाडी ते मांडेसर, दहेगाव ते रोहणा बेटाळा, मोहाडी ते कुशारी, आंधळगाव ते वडेगाव हे मार्ग नाल्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितुीनुसार, दि. २१ ते २३ जुलै दरम्यानच्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भंडारा तालुक्यात ८ गावांमध्ये १३ घरे अंशत: पडलेली आहेत. यामुळे १ लक्ष २४ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. २ घरे पूर्णत: पडल्याने ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील ८ गावामध्ये ११ घरे अंशत: पडले यात १ लक्ष २७ हजार ८५० रुपयाचे नुकसान झाले. १ घरांचे पूर्णत: पडल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यात ७ गावामध्ये ११ घरे अंशत: पडली. यात ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन घरे पूर्णपणे पडल्याने ७० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील कारधा गावातील २ कुटुंबातील ९ व्यक्तींना सुरक्षित हलविण्यात आले. गणेशपूर नाल्यावर पुराचे पाण्याची थोप आल्याने २ कुटुंबातील ८ व्यक्तींना सुरक्षित जागेवर हलविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)