पोहरा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:02+5:302021-01-20T04:35:02+5:30

भाजपा समर्थित ग्राम विकास पॅनल व काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी पॅनल यांच्यात पोहरा ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. प्रभाग क्र. ...

BJP flag on Pohra Gram Panchayat | पोहरा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

पोहरा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

भाजपा समर्थित ग्राम विकास पॅनल व काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी पॅनल यांच्यात पोहरा ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली.

प्रभाग क्र. १ मधून रामलाल पाटणकर, वैशाली रामटेके, रेखा गायधने, प्रभाग क्र. २ मधून यशवंत खेडीकर, दीक्षा गिऱ्हेपुंजे, जयश्री नगरकर, प्रभाग क्र. ३ मधून अमरदास बोडणकर, सरिता मांढरे, प्रभाग क्र. ४ मध्ये ओमप्रकाश बोडणकर, अंबाली खेडीकर, प्रतीक्षा वालदे यांनी विजय प्राप्त केला.

विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. रॅलीत माजी जि.प. सदस्य डॉ. सुदाम शहारे, भाजपाचे जिल्हा महामंत्री मंगेश मेश्राम, फारुख छव्वारे, घनश्याम मते, विष्णू गिऱ्हेपुंजे, ईश्वरदास अर्जुनकर, रवी खेडीकर, केशव नगरकर आदी भाजपाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते .

Web Title: BJP flag on Pohra Gram Panchayat