सावरी कब्रस्तान बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:41 IST2021-09-14T04:41:36+5:302021-09-14T04:41:36+5:30

जवाहरनगर : अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रातील मूलभूत/ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामीण ...

Bhumi Pujan of Savri Cemetery construction | सावरी कब्रस्तान बांधकामाचे भूमिपूजन

सावरी कब्रस्तान बांधकामाचे भूमिपूजन

जवाहरनगर : अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रातील मूलभूत/ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रमांन्वये ग्रामपंचायत सावरी कार्यक्षेत्रात अल्पसंख्याक समुदायाकरिता कब्रस्तान बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेथ शामकुवर व जि.प. माजी सभापती प्रेम वनवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच चंदा बागडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पारधी, ग्रा.पं. सदस्य,गिरीश ठवकर, तेजश्री डोंगरे, संगीता शहारे, असपाक शेख, बजमे ईल्लाही मश्जीद कमिटी सावरी जवाहरनगरचे हाजी सय्यद फराहन उद्दीन, हाजी शब्बीर शेख, हाजी जावेज खान, सैय्यद अजरुद्दीन, जमील खान, अब्दुल फहीम कुरेशी, सय्यद निजामुद्दीन, सय्यद फारुख अली, आबीद शेख, सदरेआलम, सलीम कुरेशी, हशन शेख, माणिक ढोने, रामू बोरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Savri Cemetery construction