शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरात होणार भूमिगत गटारे!

By admin | Updated: March 27, 2015 00:23 IST

दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात भुमिगत गटारे (अंडर ड्रॅनेज सिस्टएम) बांधण्याची योजना नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात भुमिगत गटारे (अंडर ड्रॅनेज सिस्टएम) बांधण्याची योजना नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना व भुमिगत गटारे बांधण्यासंदर्भातला प्रस्ताव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्राची अंतरीम मान्यता मिळाल्यास शहरात या बांधकामांना प्रारंभ करता येणार आहे. प्राथमिक स्वरूपात या योजनेवर ज;यपास १५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.सन १९८४ च्या नियमातर्गत शहरात प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७० लीटर पाण्याची गरज आहे. मात्र या उदिष्ठाची प्रतिपूर्ती मुलधूत सुविधांअभावी सध्या होत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या धोरणानुसार ‘अंडरग्राऊंड ड्रॅनेज सिस्टम’ योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिदिन १३५ लीटर पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. या आशयाअंतर्गत भंडारा शहराची व्याप्ती व स्वरूप पाहता आगामी काळात शहरात भुमिगत गटारे योजना कार्यान्वित करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नदीत उपलब्ध असलेले पाणी व नागरिकांची गरज यावर अभ्यास करून भंडारा नगर पालिका प्रशासनाने जुन्या प्रस्तावात बदल करण्याचे ठरविले. यात शहरात १६८ किलोमीटर पाण्याची जलवाहिनी घालणे, एक जलशुद्धीकरण सयंत्र बसविणे यासह अनेक लहानमोठ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु १३५ लीटर पाण्याची उपयोगिता झाल्यावरच भुमिगत गटारे योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचा समावेश आता ‘अर्बन इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम टाऊन’ मध्ये करण्यात आला आहे. परिणामी या दोन्ही योजनेचा खर्च १५० जाण्याची शक्यता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या आशयाच्या प्रस्तावाला अंतिम रुप देण्याचे काम सुरु असून तो प्रस्ताव मार्च अखेर संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाल्यास शहराच्या विकासकामाला गती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळा तोंडावर आहे. नदीत भरपूर पाणी असतानाही भंडारेकरांना दोन वेळा नाही किमान एकवेळा तरी भरपूर पाणी मिळेल, अशी व्यवस्था तरी पाणीपुरवठा विभागाकडे नाही.