शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Bhandara: आरटीई मोफत प्रवेशाकडे ५० पालकांची पाठ, चार फेऱ्यांनंतर आता प्रवेशाची आशा धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 15:22 IST

RTE Free Admission: शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटत असले तरी, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेशाच्या फेऱ्यांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. चौथी फेरी होऊनही ५० जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.

- देवानंद नंदेश्वर भंडारा - शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटत असले तरी, शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेशाच्या फेऱ्यांचे गुऱ्हाळ सुरूच आहे. चौथी फेरी होऊनही ५० जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे पालकांनी इतरत्र प्रवेश घेतले आहेत. परिणामी, आरटीईच्या मोफत प्रवेशाकडे ५० पालकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडत (लॉटरी) काढण्यात आली होती. जिल्ह्यातील ८९ शाळांमध्ये ७६३ जागा आरटीईअंतर्गत आरक्षित असून, त्यासाठी ५ एप्रिलला काढण्यात आलेल्या सोडतीत ७६३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक १, २, ३,४ मधील सर्व बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौथ्या फेरीपर्यंत ७१३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चिती झाला असून, त्याची टक्केवारी ९३.४५ आहे. आता मोफत प्रवेशाची आशा धूसर झाली आहे. लाखनी तालुक्यात अत्यल्प प्रतिसादआरटीईअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून कित्येकदा मुदत वाढवून देण्यात आली. यात लाखांदूर तालुक्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसत आहे. तेथे सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, तालुका प्रथम क्रमांकावर आहे. लाखनी तालुक्यात प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, ७६ पैकी फक्त ६० प्रवेश निश्चित झाले. त्याची ७८.९५ एवढी टक्केवारी असून, लाखनी तालुका जिल्ह्यात माघारलेला आहे. तालुकानिहाय शाळा व प्रवेशतालुका शाळा जागा प्रवेशभंडारा २५ २२० २०३लाखांदूर ४ २० २०लाखनी ८ ७६ ६०मोहाडी १६ १२२ ११८पवनी १२ ७७ ७६साकोली ९ ७९ ७५तुमसर १५ १६९ १६१एकूण ८९ ७६३ ७१३

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाMaharashtraमहाराष्ट्र