शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रावर सिंचन विहिरीचा लाभ

By admin | Updated: August 23, 2014 23:48 IST

ओलीताखाली असलेली शेती कोरडवाही दर्शवून तसेच शेतात सिंचन विहिर असताना सात बाऱ्यावर खोडतोळ करून तालुक्यातील मासळ येथील शेतकऱ्याने प्रशसनाची दिशाभूल करून सिंचन

लाखांदूर : ओलीताखाली असलेली शेती कोरडवाही दर्शवून तसेच शेतात सिंचन विहिर असताना सात बाऱ्यावर खोडतोळ करून तालुक्यातील मासळ येथील शेतकऱ्याने प्रशसनाची दिशाभूल करून सिंचन विहिर हडपल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने तक्रारकर्त्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.तालुक्यातील मासळ येथील लालप्रसाद शामदेव गोंडाणे यांच्या माकलीच्या गट नं. २२९ आराजी १.०० हे.आर. मध्ये फार पूर्वीपासून सिंचन विहिर असून तसी सातबाऱ्यावर नोंद आहे. सदर शेती ओलीताखाली असल्याची नोंद आहे. परंतू सन २०१२-१३ मध्ये सदरहु व्यक्तीने सात बाऱ्यावर असलेली विहिरीची नोंद खोडतोड करून तसेच ओलीताखाली असलेली शेती कोरडवाहू दर्शवून रोजगार हमी योजने अंतर्गत पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल केला. कोणत्याही प्रकारची फेर तपासणी न करता सचिव व तलाठ्यांनी कागदपत्र बनावट पुरविले व १ लक्ष ३१ हजार २५० रूपयाचा सिंचन विहिरीचा निधी मंजूर केला, सिंचन विहिरीचे बांधकाम केले.एकीकडे ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती फक्त सिंचनाची साधने उपलब्ध होत नाही. पंचायत समिती स्तरावर खेटरे मारून ही लाभाच्या योजना मिळत नाही. मात्र आर्थिक देवाण घेवाण करून योजना मनासारख्या मिळवितात. अशातला हा प्रकार असून तेथील शालिकराम राजाराम चुटे यांच्या लक्षात आला. हा प्रकार ग्रामपंचायत व शासन प्रशासनाची दिशाभूल करण्यात असून अशा लाभार्थ्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी तहसीलदार, खंडविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांचेकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतू असले प्रकार घेतल्या राहतात. तक्रार करूनही उपयोग नाही म्हणून येथील खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी चौकशी करण्याचे टाळले. दि.३ एप्रिलचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लाखांदूरचे खंडविकास अधिकाऱ्यांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ओलिताची शेती कोरडवाहू दाखवून व रेकार्डमध्ये खोडतोड करून विहिरीचा काम घेवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशीचे पत्र दिले. परंतु खंडविकास अधिकाऱ्यांनी पत्राला केराची टोपली दाखवत प्रकरण बंद केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर उपोषणाला मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा शालिकराम चुटे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)