शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे

By admin | Updated: February 11, 2015 00:42 IST

सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, ...

साकोली : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षीत जीवन जगता यावे यासाठी शासनाचे विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी व्यक्त केले.नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोलीच्या प्रांगणात महसूल विभागातर्फे आयोजित सुवर्ण जयंती राजस्व अभियान विस्तारित स्वरूपातील समाधान योजना कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले होते. अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. हंसा गोहणे, सभापती नारायण वरठे, उपसभापती श्रावण बोरकर, पंचाय समिती सदस्य यादोराव कापगते, जिल्हा परिषद सदस्य सुनिता कापगते, जया भुरे, कृषी अधिकारी चौधरी, खंडविकस अधिकारी व्ही.टी. बोरकर, नायब तहसिलदार दिनकर खोत, पवार व जी. एस. मासुरकर उपस्थित होते.प्रास्ताविक तहसिलदार डॉ. हंसा मोहणे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, तीन वर्षापासून तालुक्यातील सर्वच कामाची नोंद बुक मध्ये करण्यात आली असून आतापर्यंत जातीचे दाखले २ हजार ६०२, रहिवासी दाखले १ हजार ४७०, उत्पन्नाचे दाखले पाच हजार ६५, ९४ गावात चावडी वाचन करून ३८७ मय्यत खातेदार व १८० वारस फेरफार प्रकरणे आहेत. दोन हजार वनजमिनीचे अर्ज प्राप्त व ३८७ पट्टे वाटप, १ हजार २३० लाभार्थ्यांना नवीन राशनकार्ड वाटप, संजय गांधी योजना ५५०, श्रावणबाळ ४५०, राष्ट्रीय कुटूंब योजना १०० प्रकरणे व आम आदमी १६५ प्रकरणे मंजूर करून लाभ देण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी महसूल विभागातर्फे १२२, कृषी विभाग ७३, भूमिअभिलेख कार्यालय ६७, बालविकास कार्यालय ८८, पशुसंवर्धन विभाग ११९, पंचायत समिती ५५, आरोग्य विभाग १३०, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना २७ प्रकरणे यावेळी तात्काळ पूर्ण करण्यात आले असून ही कामे या कार्यक्रमाची यशस्विताच म्हणावी लागेल, असे मत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन साकोलीचे मंडळ अधिकारी निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन तलाठी शिंदे व तलाठी ठाकरे यांनी केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)