शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 00:31 IST

यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

नाना पटोले यांची माहिती : खासदार, आमदारांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना दिला दिलासासाकोली : यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. किन्ही मोखे येथे लष्करी अळीच्या प्रकोपाने नुकसान झालेल्या पिकांची पाणी करताना खासदार नाना पटोले यांनी ही माहिती यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली.लष्करी अळी, गादमाशी रोगापासून पिकांना नुकसान झाले असेल त्यांना पूर्णपणे नुकसान भरपाई मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या नावे साधा अर्ज करून त्यात पिकविम्याचे नंबर टाकायचे आहे. अर्ज प्राप्त होताच कृषी सहायक त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे व त्या आधारावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. किन्ही येथील शेतकऱ्यांच्या पिकांना अडींचा प्रादुर्भाव दिसून आला. खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांनी शेतबांधावर भेट दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी किरवे, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी पर्यवेक्षक चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी खासदार पटोले यांनी परिसरातील शेतीची पाहणी केली व त्यावर कृषी विभागाने तात्काळ उपाय करण्याच्या सुचना दिल्या. तालुक्यात लष्करी अळीचा प्रादूर्भाव असून शेत पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पुन्हा नव्या संकटामुळे अडचणीत आणले आहे. (तालुका प्रतिनिधी)यावेळी शेतकऱ्यांची समस्या गंभीर आहे. आधीच निसर्ग कोपला व रोगाने कहर माजविला. त्यामुळे या लष्करी अळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनातर्फे लवकरच अनुदानावर किटकनाशक औषधी तात्काळ पुरवू. तसेच भारनियमनावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना कृषीपंपाचे कनेक्शन मिळाले नाही, त्यांना लवकरच देऊ.- बाळा काशीवारआमदार, साकोली