शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 80 सहकारी संस्थाचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ३१ मार्च राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांची नाेंद करण्यात आली हाेती. त्यापूर्वी २०१९ मध्ये १५१५ संस्थांची नाेंदणी झाली हाेती. २०२० मध्ये जिल्ह्यात ५८ सहकारी संस्थांची त्यात भर पडली. आणि यावर्षीच्या १२ सहकारी संस्थांसह एकूण ८० सहकारी संस्था अवसायनात गेल्या आहेत. त्यात २६ सहकारी पत संस्था आणि ५४ इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनाेंदणी हाेणार रद्द : अनेक संस्थांचे अस्तित्वच नाही, सहकार क्षेत्राला घरघर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
‘विना सहकार, नाही उद्धार’, असे म्हणत सहकारातून समृध्दीचे स्वप्न पाहत जिल्ह्यात सहकारी संस्थाचे जाळे विणण्यात आले. मात्र काहींनी या संस्थाचा वापर वैयक्तीक वापर करुन संस्थांना डबघाईस आणले. अशा जिल्ह्यातील ८० संस्थांचे दिवाळे निघाले असून सहकार विभागाकडून त्यांची नाेंदणी रद्द करण्याची कारवाई प्रस्थावित आहे. काही संस्था तर नाममात्र असून त्यांचे कुठे अस्तीतत्वही दिसत नाही. 
जिल्ह्यात ३१ मार्च राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांची नाेंद करण्यात आली हाेती. त्यापूर्वी २०१९ मध्ये १५१५ संस्थांची नाेंदणी झाली हाेती. २०२० मध्ये जिल्ह्यात ५८ सहकारी संस्थांची त्यात भर पडली. आणि यावर्षीच्या १२ सहकारी संस्थांसह एकूण ८० सहकारी संस्था अवसायनात गेल्या आहेत. त्यात २६ सहकारी पत संस्था आणि ५४ इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. 
सहकाराच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहत या संस्था उभारल्या. मात्र संस्थाप्रमुखांनी या संस्थाचा उपयाेग वैयक्तीक स्वार्थासाठी करुन संस्थाला डबघाईस आणले. काही ठिकाणी व्यवस्थापनाच्या चुकाही याला कारणीभूत आहेत. आता दिवाळे निघालेल्या ८० सहकारी संस्थांचे सहकार विभागाकडून मुल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर त्यांचा लिलाव हाेण्याची शक्यता आहे. संस्थांजवळ संपत्ती नसेल तर त्यांची नाेंदणी रद्द करण्याची कारवाई केली जावू शकते. काेणतीही सहकारी संस्था दहा वर्षापेक्षा अधिक काळ अवसायनात ठेवता येत नसल्याचे जिल्हा उपनिबंधक मनाेज देशकर यांनी सांगितले. जिल्ह्यात २८ संस्था सहा वर्षापेक्षा अधिक काळापासून अवसायनात आहे. तर ३८ संस्था तीन ते सहा वर्ष, एक संस्था दाेन ते तीन वर्ष, आठ संस्था दाेन वर्ष आणि पाच सहकारी संस्था एक वर्षापासून अवसायनात आहे. 
अवसायनातील काही संस्था डाॅरमेंट अर्थात नाममात्र दिसून येत आहे. तर काही सहकारी संस्थांचे तर अस्तित्वही दिसत नाही. त्यांचा शाेध घेवूनही या संस्था सापडत नसल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

काही संस्थांवर प्रशासक
अवसायनात आलेल्या संस्थाची यादी घाेषित करण्यात आली आहे. तहसीलस्तरावर सहायक निबंधकांना काही संस्थांवर अवसायक म्हणून नियुक्त करुन कारवाई सुरु करण्यात आली आहे. एकंदरीत जिलह्यातील सहकाीर संस्थांना घरघर लागल्याचे दिसून येत आहे. माेठ्या सहकारी संस्थाही डबघाईस आल्याचे दिसत आहे.
 

भंडारा जिल्ह्यातील अवसायनात आलेल्या सहकारी संस्थांच्या विरुध्द मार्च महिन्यापासून कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या संस्थांचे मनने ऐकण्यासाठी एक महिन्याचा वेळही देण्यात आला. परंतु काेराेना संक्रमाणामुळे सभा आयाेजित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कारवाईची वेळ वाढवून देण्यात आली. आता डिसेंबर महिन्यापासून कारवाई केली जाईल.
- मनाेज देशकर, 
जिल्हा उपनिबंधक भंडारा