शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार

By admin | Updated: August 28, 2016 00:21 IST

चॉकलेटचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार तर एकीचा विनयभंग केला.

एकीचा विनयभंग : जवाहरनगर येथील घटना, आरोपीला पोलीस कोठडीभंडारा : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार तर एकीचा विनयभंग केला. ही घटना जवाहरनगर येथील सुयोगनगर येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय नराधन कमलेश जनार्धन वालदे याला अटक केली आहे.यातील अत्याचारीत दोन पीडिता या नऊ व सहा वर्षांच्या असून विनयभंगातील पीडित बालिका ही पाच वर्षांची आहे. जवाहरनगर येथील सुयोगनगर येथील आरोपी व पीडितांचे एकमेकांच्या शेजारी घर आहेत. शेजारी असल्याने आरोपीचे पीडितांच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. दोन्ही कुटुंबांशी सलोख्याचे संबंध असल्याने कुणालाही याबाबत पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्यानंतर प्रकरण समोर आले. ११ आॅगस्टला नेहमीप्रमाणे कमलेश हा पीडित बालिकेच्या घरी गेला. याने तिला चॉकलेटचे आमिष देवून स्वत:च्या घरी आणले. त्यानंतर वासनांध युवकाने बालिकेचा विनयभंग केला. यानंतर घडलेली माहिती बालिकेने आईला दिली. बालिकेने कथन केलेल्या भयान वास्तवानंतर आईला जबर धक्का बसला. पण स्वत:ला सावरून बालिकेला विश्वासात घेवून सविस्तर विचारले असता, कमलेश नेहमीच असे करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. यानंतर पीडितेच्या आईने जवाहरनगर पोलिसात कमलेश वालदे विरूध्द तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी कमलेशविरूध्द कलम ३७६, ३५४ (अ), ५०६, पोस्को ४ व ८ कलामान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला २९ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास ठाणेदार आर. आर. नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रीती आडे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)असे उघडकीस आले प्रकरणघराशेजारील अल्पवयीन बालिकेवर वाईट नजर ठेवून विनयभंग केल्याची माहिती पीडित पाच वर्षीय बालिकेने आईला सांगितली. या घृणास्पद कृत्यामुळे संतप्त आईने युवकाशी वाद घातल्याने बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला. यामुळे त्यांच्याच घराशेजारी राहणाऱ्या दोन पीडित बालिकेच्या आईवडीलांनीही त्यांच्या नऊ व सहा वर्षीय बालिकांवर याच नराधमाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार कथन केला.