शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित

By admin | Updated: July 17, 2014 23:55 IST

जिल्ह्यातील खासगी अनुदानित विजाभज आरश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर व वसतीगृह कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यापासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

उपासमारीची वेळ : आॅनलाईन प्रक्रिया ठप्पभंडारा : जिल्ह्यातील खासगी अनुदानित विजाभज आरश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर व वसतीगृह कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यापासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारेखला वेतन मिळण्याकरीता मे २०१३ पासून लागू करण्यात आलेली समाज सेवार्थ आॅनलाईन प्रणाली पुर्णत: विफल ठरली आहे.भंडारा जिल्ह्यात समाजकल्याण विभागाअंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्यण, भंडारा यांच्या नियंत्रणात ६ प्राथमिक व १ माध्यमिक आश्रमशाळा अशा एकूण ७ विजाभज जातीच्या आश्रमशाळा आहेत. यातील १ प्राथमिक आश्रमशाळा विमाप्रची आहे. या आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यपासून वेतन मिळाले नसल्यामुळे या कर्मचाऱ्यावंर उपासमारीची पाळी आली आहे. सहा महिने वेतन न मिळाल्यामुळे, या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या पगारतारण कर्जावर लाखो रूपयांच्या व्याजाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागणार आहे. आयकराची रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर मोठा दंड बसणार आहे.या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळण्याकरीता समाजकल्याण विभागाने समाज सेवार्थ आॅनलाईन प्रणाली मे २०१३ पासन सुरू केली. पण ही प्रणाली पुर्णत: विफल ठरली आहे. त्यामुळे अगोदरची आॅनलाईन प्रणालीच चांगली होती, असे कर्मचारी म्हणत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे वेतन परत आॅनलाईन प्रणालीनेच पाठविले आहे. पण हे वेतनबिल मंजूर झाल्याशिवाय पुढचे महिन्याचे वेतनबिल पाठविले जावू शकत नसल्यामुळे वेतनबिल पाठविण्याचे कामच पुर्णत: ठप्प पडले आहे.या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरीता निधी नसल्याची माहिती आहे. या आश्रमशाळांचे नियंत्रण करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला होताच पण आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकरीता कार्यालय प्रयत्न का करीत नाही, हे एक कोडच ठरले आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांना लवकरात लवकर वेतन देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)