शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

खैरी येथे पुरातत्त्व अवशेष कायम

By admin | Updated: February 15, 2015 00:37 IST

भूतकाळात होऊन गेलेल्या घटना इतिहासात जमा होतात. गतकाळात होऊन गेलेल्या घटनांची माहिती पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू आजही अस्तित्वात आहेत.

प्रकाश हातेल चिचाळभूतकाळात होऊन गेलेल्या घटना इतिहासात जमा होतात. गतकाळात होऊन गेलेल्या घटनांची माहिती पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्या काळातील कोरून ठेवलेले लेख सापडलेली त्या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास गवसतो. याशिवाय चालीरिती, स्त्री परंपरा, लोककला, लोकसाहित्य समकालीन कागदपत्रे यातूनही इतिहासाची माहिती होते.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रनाळा गटग्रामपंचायत अंतर्गत खैरी (तेलोता) या छोट्याशा २५६ लोकसंख्येच्या गावात पूर्वजांनी तयार केलेले अवशेष आजही अस्तित्वात आहेत. खैरी हे गाव तलावाच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावाच्या उजवेकडे विशाल तलाव आहे. तलावाच्या मध्यात पूर्वजांनी स्थापन केलेली हनुमंताची पाच फुट उंच दगडाची कोरीव प्रतिमा आणि भगवान शिवशंकराचे वाहन नंदीबैल तलावातील पाच फुट मुरुमाच्या ओट्यावर आहे. अगदी त्यासमोर पाच फुट उंच मुरमी दगडाचे तीन खांब उभे करून त्याचेवर ४० फुट गोलाकार व १७ फुट आंतर लांबीचे (चौपाऱ्या) चापट आकाराचा मोठा दगड आहे. याच आकृतीला ग्रामस्थ तेलोता या नावाने संबोधतात. तेलोत्याच्या पूर्व दिशेला २०० मिटर अंतरावर शेतात ३ मुरुमी दगडाच्या ५ फूट उंच यु आकाराची आकृती तयार आहे. त्याला येथील लोक चुल म्हणून ओळखतात. खैरी येथून पाच किलोमिटर अंतरावरील पिंपळगाव निपानी या गावाशेजारील खैरी येथील तेलोत्या सारखीच दगडाची आकृती आहे. खैरी (तेलोता) येथे तयार केलेल्या पूर्वजांच्या तेलोता या वास्तूवरूनच या गावाचे नावही खैरी (तेलोता) असे पडले अशी आख्यायिका आहे.खैरी गावाशेजारीच ३०० लोकवस्तीचे ठाणा गाव होते. गावाला कॉलराच्या साथीने येथील लोक घरे दारे सोडून निघून गेले. ठाणा येथील पोलीस स्टेशन अड्याळला स्थानांतरण झाले. त्याचे आजही ठाणा येथूनच स्थानांतरण झाल्याची रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या परिसरात त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेत उत्खनन केल्यास पूर्वजांचे मानवी साहित्य, जीवनावश्यक वस्तू आढळून येतात असे खैरी येथील वयोवृद्धांनी सांगितले. यावरून पुरातनकालीन वास्तूची निर्मिती ठाणा गावातील लोकांचे गाव सोडून पळून जाणे व तिथे पूर्वजांचे अवशेष मिळणे यावरून इतिहासाची माहिती मिळू शकते. या परिसरात पुरातत्व विभागामार्फत संशोधन करण्याची वेळ आता आली आहे.