शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना चोख उत्तर द्या

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

भाजप-सेनेची सत्ता स्थापन झाल्या दिवसापासून शासन जनतेला दिलेल्या वचनांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान करीत आहे.

भाजपचा मेळावा: शोभा फडणवीस यांचे आवाहनलाखनी : भाजप-सेनेची सत्ता स्थापन झाल्या दिवसापासून शासन जनतेला दिलेल्या वचनांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान करीत आहे. त्याचे परिणाम दिसायला आता सुरुवात झालेली आहे. विरोधकांच्या पायाखालीच वाळू सरकायला लागली. क्षुल्लक बाबींवरून हेच आहेत का अच्छे दिन म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशबुडव्या, राज्य बुडव्या राज्यकारण्यांना योजनांचे स्वरुप व उपलब्धी सांगून त्यांचे तोंड बंद होईल असे चोख उत्तर द्यावे, असे आवाहन आमदार शोभा फडणवीस यांनी केले.लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात भाजपा भंडारा जिल्हा सर्व विभाग कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, मच्छीमार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रकाश मालगावे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, नागपूरचे माजी महापौर माया इनवाते, डॉ.युवराज जमईवार, चैतन्य उमाळकर, सुनिल मेंढे, प्रशांत खोब्रागडे, राजेश बांते, निशीकांत इलमे, इंद्रायणी कापगते, कुंदा वैद्य, प्रदीप पडोळे, प्रकाश बाळबुद्धे, हंसा खोब्रागडे, शिवराम गिऱ्हेपुंजे, धनंजय मोहकर, नितीन कडव, रेखा भाजीपाले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमदार वाघमारे यांनी शासनाच्या योजना प्रत्यक्ष जनतेला कशा मिळतील व त्या कोणकोणत्या आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. आतापर्यंत कोणत्या योजनांचा जनतेला लाभ मिळाला आणि मिळत आह,े अशा योजनांबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली. केवळ दोन वर्षात भाजपाने हे सर्व करून दाखविले अशांचा प्रचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी जनतेला भाजपाबद्दल विश्वास वाटेल याचा फायदा पक्ष वाढीसाठी निश्चित होईल. त्याकरिता पक्ष शिस्तीप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपले वर्तन ठेवण्याची आवश्यकता आहे. यावेळी मुरमाडी (सावरी) चे सरपंच राजेश खराबे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. संचालन भरत खंडाईत यांनी तर, आभार प्रशांत खोब्रागडे यांनी मानले. मेळाव्याला जिल्ह्यातून विविध स्तरावरील ५०० कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीची संपूर्ण तयारी लाखनी तालुकाध्यक्ष पद्माकर बावनकर, निरज मेश्राम, महेश आकरे, वाल्मीक लांजेवार यांनी केली होती. (तालुका प्रतिनिधी)